पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[८५


खाड्ये यांनी लिहिला होता, व दुसरा नागपूरचे प्रो. बेहेरे यांनी लिहिला होता असें वाटतें. आणि नाटक रंगभूमीवर आणण्यापूर्वी, महाराष्ट्र मंडळींतील नट रा. कारखानीस यांना सगळ्या नाटकाची तालीम अेका बैठकीस दाखविली. तेव्हा त्यांनी असे अुद्गार काढले कीं, हें नाटक तोतयाच्या बंडापेक्षाहि अधिक चांगलें वठलें आहे. कथानक स्वतंत्र व चांगलें रंगलेलें या दृष्टीने माझ्या सर्व नाटकांत व्यक्तिश: मला तरी हेंच नाटक सर्वांत अधिक आवडतें.
 (७३) यानंतर तिसरें नाटक लिहिलें तें कृष्णार्जुनयुद्ध. यांतील कथानक मुळीच स्वतंत्र नाही. ते सर्वच्या सर्व अेका हरिदासी आख्यानावरून घेतलेलें आहे. फक्त प्रवेशरचना व संभाषणांतील खटके, अुत्तरें, प्रत्युत्तरें हीं कपोलकल्पित आहेत. या नाटकांत करुणास्पद असा भाग म्हणजे चित्ररथ गंधर्वाचा होअूं घातलेला वध. पण कांही अंशीं चित्ररथ हा प्रथम दारूच्या धुंदींत असतो तेव्हा त्याचा अुन्मत्तपणा हा हास्यरसपोषक होतो. तसाच दारूची धुंदी अुतरल्यावर तो जो भित्रेपणा दाखवितो व शोक करतो त्याचा हि परिणाम हास्यास्पदच होतो. नाही म्हणावयाला बिचाऱ्या त्याच्या स्त्रीचें दुःख मात्र खरें वाटतें. गंगाकांठच्या स्मशानांतील प्रवेश अेरवी करुणास्पद व भयानक वाटावयाचे; परंतु आधीपासून नारदाच्या लावालावीचा प्रकार सुसंगत चालू राहिला असल्याकारणाने, समोर स्मशानांत चिता पेटलेली दिसली तरी, ही नारदाच्या कारस्थानाची परिणति व अेखाद्या नव्या विनोदी प्रसंगाची प्रस्तावना असेंच प्रेक्षकाला वाटूं लागतें. या सर्व नाटकांत खरा गंभीर प्रवेश म्हटला म्हणजे अगदी शेवटचा - कृष्ण व अर्जुन यांची प्रत्यक्ष रणांगणावर गाठ पडते तेव्हाचा. त्यांतील अुत्तरें व प्रत्युत्तरें कोटिक्रमाच्या दृष्टीने चटकदार व समर्पक असल्यामुळें, बिनतोड प्रत्युत्तराने अुत्पन्न होणारा विनोद या गंभीर प्रवेशांतहि प्रगट होतो. तात्पर्य, या नाटकांतील असा अेकहि प्रवेश नाही की ज्यांत विनोद रंगत नाही व प्रेक्षकाला हसू येत नाहीं. या नाटकाचा प्रयोग पंढरपुरास प्रथम झाला तेव्हा " हास्ययुक्त अशा १३४ टाळ्या पडल्या" असें वर्णन कंपनींतील एका निकाम्या नटाने आठवण ठेवून पत्राने मला कळविल्याचें स्मरतें. पण या संख्येत विशेष असें कांही नाही. कारण नाटक-गृहांत अेकदा प्रारंभींच