वेरुळची राष्ट्रकूटकालीन लेणी निराळी दिसून येतात. त्यांच्या स्तंभांची रचना निराळी असते. हे स्तंभ चौकोनी असून त्यांची रांगच्या रांग लागलेली असते. वेरुळच्या दशावतार लेण्यातील स्तंभांची रचना अशीच आहे. राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक दंतिदुर्ग याने हे कोरविलेले आहे. त्याचा तेथे एक शिलालेखही आहे. येथली शैव आणि वैष्णव शिल्पे अत्यंत सुरेख आहेत. 'रावण की खाई' व 'रामेश्वर' या राष्ट्रकूटांच्या गुंफांत अनेक सुंदर मूर्ती पाहावयास मिळतात.
बौद्ध
बौद्धांची लेणी अशीच सुंदर मूर्तींनी संपन्न आहेत. बोधिवृक्षाच्या छायेत बसलेला बुद्ध, सिंहासनावर बसलेला बुद्ध, बोधिसत्त्व, कुबेर यांच्या मूर्ती, पूर्णकलायुक्त षट्कोनी, अष्टकोनी स्तंभ, गंगायमुनांच्या मूर्ती, गंधर्व-मिथुने, इतर अनेक नृत्यमूर्ती, हे सर्व काम अप्रतिम आहे. मध्ये मोठा मंडप, भोवताली स्तंभ, त्यामध्ये गर्भगृह, भोवती विहार अशीच साधारणतः बौद्ध लेण्यांची रचना असते.
जैन
वेरुळ येथील जैनांची लेणी दिगंबर पंथी असून त्यात गोमटेश्वराच्या प्रतिमा सर्वत्र आढळतात. तीर्थंकरांच्याही अनेक मूर्ती असून तेथील नक्षीकाम विशेष चांगले आहे. क्र. ३० चे लेणे हे छोटा कैलास या नावाने प्रसिद्ध असून, हे मंदिर द्रवीड पद्धतीचे आहे. गर्भगृहात भगवान महावीरांची मूर्ती असून बाजूच्या भिंतीत तीर्थंकरांच्या प्रतिमा आहेत. यक्षांच्या नृत्यमूर्ती, गंधर्व-मिथुने अशा मूर्तींही पुष्कळ असून उत्तरेकडील भिंतीत अष्टभुजा देवीचीही मूर्ती आहे. सभामंडपाच्या छतावर रंगीत चित्रांचे अवशेष अजूनही दिसतात. त्यावरून अजंठ्याप्रमाणे येथेही चित्रे काढलेली असावीत असे दिसते.
सातवाहन ते चालुक्य अखेर म्हणजे सुमारे तेराशे वर्षांच्या काळातील महाराष्ट्राचे शिल्प, चित्र, स्थापत्य, मूर्ती या कलातील वैभव असे अद्वितीय आणि अलौकिक आहे.
घारापुरी
वेरुळ, अजंठा, नाशिक, कार्ले येथल्याप्रमाणेच घारापुरी व अंबरनाथ येथील शिल्पही महाराष्ट्रीय कलाकारांना भूषणभूत असेच आहे. मुंबईपासून पाच सात मैलांवर समुद्रातील एका लहानशा बेटावर घारापुरी हे गाव आहे. या बेटावरील डोंगरात पाच लेणी खोदलेली असून त्यांत शिवपार्वतीविवाह, गंगावतरण, तांडवनृत्य, अंधकासुरवध, इ. शिवकथा साकार केलेल्या आहेत. ही दृश्ये फार रम्य असून ती शिवाचे जीवन डोळ्यांपुढे उभे करतात. मुख्य लेण्यात एक भव्य दालन असून त्यात अकरा हात उंचीची एक त्रिमुखी मूर्ती आहे. ही तीन मुखे ब्रह्मा, विष्णू, महे-
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२६४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३७
साहित्य, कला व विद्या