पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विधींना महत्त्व देतात, तर ते विधी योग्य आणि धर्मतत्त्वांना धरून तरी असावेत, हे स्पष्ट आहे.” सयाजीरावांनी धर्म हा कधीच वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न केला नाही, तर सामाजिक जीवनाचे एक अंग म्हणून धर्माबाबत लोकांनी जास्तीत जास्त वैज्ञानिक पद्धतीने विचार करावा यासाठी प्रयत्न केले.
 १ ऑगस्ट १९९६ रोजी सयाजीरावांनी बडोदा कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान आणि तुलनात्मक धर्म अभ्यासाचे जगातले बहुधा पहिले अध्यासन सुरू केले. या अध्यासनाच्या वतीने १९१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'द गायकवाड स्टडीज इन रिलीजिन अँड फिलॉसॉफी' या मालेत हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू या प्रमुख धर्मांवरील ग्रंथांबरोबर तुलनात्मक धर्म अभ्यास आणि नीतिशास्त्र या विषयांवरील एकूण १७ ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. आजवरच्या जगाच्या इतिहासातील अशा प्रकारची ही एकमेव ग्रंथमाला आहे.
सयाजीरावांची क्रांतिकारक मांडणी : 'The Depressed
Classes' निबंध

 १९३६ च्या Annihilation of Caste या आपल्या जगप्रसिद्ध ग्रंथात 'प्रबोधनाशिवाय कोणतीही क्रांती होत नाही' हा जो क्रांतिकारक सिद्धांत बाबासाहेब मांडतात. त्या सिद्धांताची तुलना सयाजीरावांच्या धर्मसाक्षरता अभियानाशी केली असता बाबासाहेबांनी हा सिद्धांत मांडण्याअगोदर ५० वर्षे सयाजीरावांनी १८८६ मध्ये ऐनेराजमेहेल या अत्यंत क्रांतिकारक

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / १२