पान:महाराजा सयाजीराव आणि शेतीविकास.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बडोद्याच्या सहकार चळवळीच्या उभारणीतील अधिकाऱ्यांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करताना सयाजीराव म्हणतात, “मुलकी खात्यांतील काही अधिकारी या चळवळीत हौसेने लक्ष घालीत असलेले पाहून मला आनंद होतो. आपली खेडी सुसंघटित व बाळसेदार झाली आणि शेतीची झाली, तर किती छान गोष्ट होईल याची त्या अधिकाऱ्यांना संपूर्ण जाणीव झालेली दिसते. शेतकरी व शेती यांची अशी सुधारणा झाली तर राज्यकारभाराचे काम बरेच सुकर होईल. इतकेच नाही तर तितक्याच महत्त्वाच्या; पण अधिक उच्च दर्जाच्या इतर सुधारणा घडवून आणण्यास सरकाराला वेळ व साधनही मिळेल. म्हणून प्रत्येक मुलकी अंमलदाराने शेतीसंबंधीच्या व्यवहारशास्त्राचा नीट अभ्यास तर करावाच; पण याशिवाय त्याने खेडेगावात आधुनिक कल्पनांचे बीजारोपणही करीत असावे, अशी माझी फार इच्छा आहे.” अधिकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे कौतुक आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करताना सयाजीरावांनी साधलेला 'सुवर्णमध्य ' आजच्या प्रशासकांनी शिकण्यासारखा आहे.
 शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनात पशुधनास अनन्यसाधारण महत्त्व आहे. बडोद्यात मुबलक प्रमाणावर उपलब्ध असलेल्या दुधावर आधारित डेअरी फार्मसारखा उद्योग सयाजीरावांनी १९२५ मध्ये 'मकरपुरा, बडोदा येथे सुरू केला. जगभरात प्रसिद्ध असणारा अमूल हा दूध उत्पादनातील ब्रॅण्ड जेथे आहे तो

महाराजा सयाजीराव आणि शेती विकास / ३५