Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव

आणि

बडोद्यातल्या वास्तू

 साधारणपणे सोळाव्या शतकापासून पाश्चात्य वास्तुशैलींचे प्रतिध्वनी भारतात उमटू लागले. पोर्तुगीजांनी गोवा येथे बांधलेल्या विविध प्रकारच्या वास्तू ही त्याची उत्कृष्ट उदाहरणे होत. नंतर ब्रिटिश राजवटीत युरोपातील नव-अभिजात शैलीवर आधारलेल्या अनेक वास्तू भारतात बांधल्या गेल्या. उदा., बडोद्यातील 'The Maharaja Sayajirao University of Baroda' (१८७९), मुंबईतील 'व्हिक्टोरिया टर्मिनस स्टेशन' (१८८८), बडोद्याचा 'लक्ष्मीविलास पॅलेस' (१८८०- १८९०), कलकत्ता येथील 'व्हिक्टोरिया मेमोरिअल' (१९०८- १२) इत्यादी. गॉथिक, प्रबोधनकालीन, बरोक इ. पाश्चिमात्य शैलींच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या वास्तूंमध्ये भारतीय शैली - वैशिष्ट्यांचा तसा अभावच जाणवतो.
 बांधकामाची कला आणि शास्त्र म्हणजे वास्तुकलाशास्त्र. वास्तुकलेला पूर्वी स्थापत्यकला असेही म्हणत असत. वास्तूची रचना, त्यांची अंतर्गत सजावट, बाहेरील बगीचा, नगर नियोजन इ. बाबींचा त्यात समावेश असतो. एखाद्या व्यक्तीची, गावाची,

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ६