पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भव्यता वाढवतात. तसेच या शिखरांसमोरील सैनिकाचा पूर्ण पुतळा या इमारतीच्या सौंदर्यात अजूनच भर घालतो. १०० वर्षांपूर्वीची ही इमारत आजही त्याच कर्तव्यात रूजू आहे. आजही या इमारतीच्या तळमजल्यावर पूर्वीसारखाच भाजीबाजार फुलतो. पहिला मजला म्युनिसिपलच्या कार्यालयास दिलेला आहे.
१८. बडोदा हायस्कूल (१९०९)
 महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी १८९३ मध्ये सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली. यामुळे शालेय विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाऊन बडोदा राज्यात प्राथमिक आणि विद्यालयीन मुलांसाठी शाळेच्या इमारती बांधाव्या लागल्या. हायस्कूलसाठी स्वतंत्र इमारत नसल्याने सुरुवातीस काही काळ

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ४७