Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यास ' श्री. चिमणाबाई न्यायमंदिर' असे नाव देण्यात आले होते. आजही ही वास्तू सूरसागर तलावाजवळ उभी आहे. या इमारतीचा नकाशा मि. आर. एफ. चिझम यांनी तयार केला होता. ही इमारतसुध्दा इंडो-सॅरसेनिक शैलीतच बांधली गेली आहे. ही इमारत चार एकरमध्ये पसरली असून स्वातंत्र्यानंतर ती बडोदा जिल्हा न्यायालय म्हणून ओळखली जाऊ लागली.

१४. सयाजीविहार क्लब (१८९९)

 इ.स. १८९९ च्या एप्रिल महिन्यात बडोद्यात सयाजीविहार क्लब सुरू करण्यात आला होता. हा क्लब खंडेराव मार्केट

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ४०