Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११. आजवा तलाव बांधकाम (सयाजी सरोवर) (१८९२)

 आजवा तलावाचे (धरण) बांधकाम २९ मार्च १८९२ ला पूर्ण झाले. महाराजांनी सर्वसामान्य जनतेसाठी भरपूर समाजिक बांधकामे करून बडोदा संस्थान सर्व दृष्टीने परिपूर्ण करण्याचा ध्यास घेतला होता. बडोद्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी हे धरण बांधले गेले. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे, हे धरण उंच

जागी बांधले असून बडोदा शहर उताराच्या बाजूला असल्याने गुरूत्वाकर्षणाचा वापर करून जनतेला शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या धरणाच्या कामासाठी ३४ लाख रुपये खर्च केल्याची नोंद सापडते. या सयाजी सरोवराच्या

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ३६