पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फत्तेसिंहराव गायकवाड यांच्यासाठी हा राजवाडा बांधण्यात आला होता. हा राजवाडाही दगडी असून इंग्लिश रेनीसॉन्स (renaissance) अर्थात प्रबोधनकाळाच्या धर्तीवर बांधला होता. या राजवाड्याचे नकाशे मुंबईचे शिल्पशास्त्रज्ञ मि. स्टिव्हन्स यांच्याकडून करून घेण्यात आले होते. चार्ल्स एफ स्टीवन्स ( मुंबई येथील प्रसिद्ध विक्टोरिया टर्मीनसची रचना करणारे ब्रिटीश आर्किटेक्ट एफ.डब्लू. स्टीवन्स यांचे चिरंजीव .)
४. इतर राजमहल
 आपल्या पूर्वजांनी बांधलेला नजरबाग राजवाडा सुस्थिती ठेवण्याची व्यवस्था महाराजांनी केली होती. सयाजीराव महाराजांच्या काळात पाहूण्यांसाठी म्हणून राजवाड्याचा वाढीव भाग वापरण्यात आला होता. इ. स. १९२७ मध्ये नजरबाग राजवाड्यातील जवाहीरखान्यात खंडेराव महाराजांनी मक्स पाठविण्याकरीता तयार करून घेतलेले मोत्याचे दोन सुंदर गालिचे ठेवण्यात आले होते. या जवाहीरखान्यात असलेल्या दागिन्यांची किंमत त्या काळातील एक कोटी डॉलर्स इतकी होती. १२५ कॅरेटचा 'स्टार ऑफ द साऊथ' (Star of the South) हा हिऱ्यांचा नेकलेस, त्याच्यासोबत एक ७८.५ कॅरेटचा 'इंग्लीश ड्रेसडेन' English Dresden, a drop shaped diamond of about 78.5 carats) हे मौल्यवान दागिने राजखजिन्यात होते.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / २३