Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विकास करत असताना सयाजीरावांनी आवश्यक असलेल्या सार्वजनिक इमारतींच्या बांधकामास प्राधान्य दिले. यामुळे विविध प्रकारच्या आणि कलात्मक वास्तूंनी बडोद्याच्या सौंदर्यात भर पडत गेली. महाराजांच्या व्यापक दृष्टीकोनाने बडोद्याचे रुपांतर ससं ्कार नगरीत होत गेले. एक एक अप्रतिम वास्तुकलेचा नमुना असणाऱ्या इमारती महाराजांच्या कल्पकतेने बडोद्यात दिमाखात उभ्या राहत होत्या आणि आजही त्याच दिमाखाने वैभवशाली इतिहासाचे दाखले देत आहेत.
 महाराज ६ डिसेंबर १९३२ ला विलायतीचा दौरा सपं वून भारतात आले आणि लगेच दुसऱ्या दिवशी चीफ इजिनियरला भेटण्यासाठी कचेरीत गेले. परदेशातून आल्यानंतर सयाजीरावांना सर्वात पहिल्यांदा बांधकाम खात्याच्या कामकाजातली प्रगती तपासण्याचे काम करायचे होते. महाराज कचेरीत जाऊन चालू बांधकाम कुठपर्यंत आले आहे, तयार के लेल्या वास्तू रचना आराखड्यात (building plan) आणि प्रत्यक्षात तयार झालेल्या बांधकामात किती फरक आहे, तो फरक चालणार आहे का नाही, तो सोयीचा अथवा गैरसोयीचा आहे का? असे अनेक प्रश्न विचारून बांधकामाबाबतची त्यांची सजकताच दाखवत. एखादी नवीन सक ं ल्पना महाराजांच्या डोक्यात आली तर ते स्वत:च्या हाताने ती कागदावर उतरवत आणि ती कल्पना आपल्या अधिकाऱ्यांना मोठ्या उत्साहाने सचवित.

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / 10