पान:महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्ञानमार्गी सयाजीराव
 'ज्ञानमार्गी' महाराजा सयाजीरावांनी एकूण २ ग्रंथ लिहिले. १८९६ मध्ये ' From Caisar to Sultan' या गिबन्सच्या ग्रंथावरील टीकाग्रंथ इंग्लंडमधून प्रकाशित झाला. त्यानंतर १९०१ मध्ये लंडन येथील मॅकमिलन प्रकाशन संस्थेतून छापून घेऊन for private circulation म्हणून महाराजांनी स्वतः प्रकाशित केलेला 'Notes on the Famine Tour' हा रोजनिशी स्वरूपातील ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ म्हणजे ऐतिहासिक 'समाजशास्त्रीय दस्तऐवज' आहे. कारण भारतातीलच नव्हे तर जगातील दुष्काळाचा शोध घेऊन राज्यकर्त्याने लिहिलेला हा एकमेव ग्रंथ आहे. ४ डिसेंबर १८९९ रोजी या ग्रंथातील नोंदी लिहिण्यास महाराजांनी सुरुवात केली होती.

 २०१२ मध्ये हार्डप्रेस प्रकाशन या जगातील दुर्मिळ आणि अभिजात ग्रंथांचे पुनर्प्रकाशन करणाऱ्या संस्थेने याचे पुनर्मुद्रण केले. Kessinger Rare Publishing ने २००८, Kessinger Legacy Publishing ने २०१० मध्ये, Palala Press ने २०१६ मध्ये या अमेरिकेतील संस्थांनी तर लंडन येथील Forgotten Books ने २०१६ मध्ये या ग्रंथाच्या आवृत्या काढल्या आहेत. थोडक्यात परदेशातील ४ आणि भारतातील ४ अशा गेल्या ११९ वर्षांत या ग्रंथाच्या एकूण ८ आवृत्या निघाल्या. अमेरिकास्थित पलाला प्रकाशनाने या ग्रंथाचा परिचय करून देताना लिहिलेला मजकूर महत्वाचा आहे. हे प्रकाशन म्हणते,

महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी / ८