Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३८ )



बालांकुर येऊन हरित पटल परिधान करून आनंदांत असलेल्या पृथ्वीवरून चालतांना मऊ गालिच्यावरून चालल्याचे सुख अनुभवतोंसें वाटतें. सर्व नदी किनारे व त्यांवरील दगड आणि टेंकडयांवरील कडे गवतानें आणि शेवाळीनें अगदी हिरवेचार दिसत असतात. नद्याचें पाणी अगर्दी दोन्हीं थडया भरून धांवा घेत असतें.

 मार्चपासून पुढें पावसाळा येईपर्यत फुलें व गवत नाहींशीं होऊन झरे व धबधबे चोहीकडे शुष्क होऊन जातात. हवेमध्यें धुरानें दाटपणा आल्यामुळे देखावे स्पष्ट दिसत नाहीत व उन्हाच्या कडकपणानेंही एकसारखी नजर लागत नाहीं. तथापि या वेळींही टेंकड्या या विलक्षण सुंदर दिसतात. सदैव हिरवे जंगलांतील झाडांस पालवी फुटू लागते आणि रान जिकडें तिकडें टवटवीत दिसतें, में महिन्याच्या अखेरीस प्रातःकाळीं जमिनीवर धुके येऊ लागतें त्यावेळीं जिकडे तिकडे आकाशावांचून कांहीं देिसत नाहीं, रस्त्यावरून चार दोन हातावरील माणसांची चाऊल ऐकूं येत नसली तर मनुष्यें आहेत