Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२४
मराठी रंगभूमि.

ज्या कंपन्या झाल्या त्यांत सांगलीकर, आळतेकर, इचल- करंजीकर, कोल्हापूरकर या कंपन्या नांवाजण्यासारख्या असून त्यांपैकी बहुतेक बरेच दिवस टिकल्या होत्या.


(मागील पृष्ठावरून चालू.)

लोकांच्या दृष्टीस येऊ देत नसत. हा खेळ त्यांनी सन १८७९।८० च्या सुमारास कोल्हापुरास नेला होता. यापुढे त्यांनी सांगली येथे इंजिनिअरिंग खात्यांत नोकरी धरली. हे ज्याप्रमाणे सुतार- काम करण्यांत वाकबगार होते त्याप्रमाणेच लोहारकाम, ओतीव काम, लेव्हल घेणे, नकाशे काढणे, कामाची मापे घेणे, गंवडी काम, कुंभारकाम इत्यादि कामांमध्येही वाकबगार होते. इमारती- संबंधाने कोणतीही एखादी अडचण आली असतां ती दूर करण्या- संबंधाने यांजकडे लोक येत व हे ती युक्तीनें दूर करीत. हा अनुभव सांगली येथील लोकांना पुष्कळ आहे. सुतारकाम है करीत होते ते साधे करीत असून सतार, ताऊस, सारंगी, कुलपी तबले इत्यादिही करीत. याशिवाय हरएक विणकरीचे काम, रंगायचे काम, गालीच्यांत तहत-हेची नकशी भरण्याचे काम इत्यादि करीत. याखेरीज तहत-हेच्या मूर्तीचे साचे, तीन चार वैलाच्या चुली, चित्रे आदिकरून हरएक किरकोळ काम करीत असत. मरणसमयीं यांचे वय ८२१८३ वर्षांचे होते. तरी हे प्रसंग पडला असतां स्वतः लांकडे फोडीत इतके हे सशक्त होते. यांना विद्याव्यासंगाची इतकी हौस असे की, हे गेल्या ८।१० वर्षांत बोलण्यापुरतें इंग्रजी शिकले ! हल्ली यांच्याजवळ संपत्ती कायती अनेक प्रकारची हत्यारे, नव्या नव्या प्रकारचे नमुने इत्यादि ३/४ आखंण भरलेलें सामान ही आहे. यांना प्रेगनें मत्य आला हे खरे; तथापि, ज्वर येण्यास मूळ, यांनी आपल्या घरच्या छोट्याशा बागेत अनेक रंगांची फुले झाडांना यावीत ह्मणून कांहीं खटपट करीत ओलीत श्रम केले हे आहे. यांना तीन मुलगे आहेत, तेही चांगले कल्पक असून गुणी आहेत."