Jump to content

पान:बाळमित्र भाग २.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोठा बाग. १५९ विद्या- को बरें तो मालक आहे, आणि त्याचे बागांत नानाप्रकारचे पदार्थ आहेत, मग का उप. भोग करीत नाही नारा०- उपभोग करावा खरा, पण त्यांतून जर तो कांहीं खाईल, तर त्याची प्रकृति अगदी बिघडेल. विद्या- ह्यावरून असे समज की आपल्या जवळ ज. री चांगले पदार्थ अनुकूळ आहेत, तरी एखादा स. मय असा येतो की, त्यापदार्थाचा उपभोग इच्छे प्रमाणे करता येत नाही, काही तरी अडचण अ- सते. माझीही अवस्था तशीच आहे, ह्मणून मला इच्छेप्रमाणे ह्या माझे बागाचा उपभोग करवत ना. ही. ते कसें ह्मणशील तर, जगत शेटास जशी प्र. रुतीची अडचण आहे तशीच मला द्रव्याची अड. चण आहे; बरे, तूंच सांग की, ह्या दोघांतून दैव. वान् कोण आहे? नारा०- खरेंच दादा, ज्याची प्रकति चांगली तो दैववा- न. प्रकृति नीट नाही तर उपभोगाचे सर्व विषय व्यर्थ आहेत. पण तुह्मांला कधी घोड्यावर बसणे आवडतें। विद्या०- मला वाटते ते समयी मी घोड्यावर बसून वि. लास करतो. नारा.- तर तुमचे कुरण आहे, मग तुझी घोडा बाळ- गून त्यास येथील गवत कापून कां नेत नाहीं विद्या- मुला, मी तसेंच करितो. ज्या घोड्यावर मी