पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झालेल्या बदलांची, त्या बदलांमागील कारणांची व बदलांमुळे विशिष्ट गटाला होणा-या फायदे/तोट्यांची माहिती जाणकार व्यक्तींना विचारून ह्या तक्त्यात भरावी. नमुन्यादाखल गडचिरोली जिल्ह्यातील येडसकुही गावातील गावालगतच्या जंगलाच्या तुकड्याचे उदाहरण घेऊ या. स्थानिक जाणकार लोकांच्या मतानुसार ह्या तुकड्याचे क्षेत्रफळ कमी झाले आहे, कारण शेतीसाठी याचा बराच भाग मागच्या दशकात वापरण्यात आला. परिणामतः मोठी झाडे कमी होऊन, रोपटी व झुडपे वाढली. ह्यामुळे वनोपज हा फायदा कमी झाला तर रानडुकरांचा त्रास भयंकर वाढला, कारण त्यांना लपण्यासाठी झुडपांची भरपूर वाढ झाली. ह्या बदलामुळे एकीकडे शेतकरी ह्या हितसंबंधी गटाचा फायदा झाला, तर वनोपज गोळा करुन पोट भरणाच्या हितसंबंधी गटाचा तोटा झाला. असेच आणखी एक उदाहरण वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) नावाच्या शहरालगतच्या पुरातन अशा ऋषी तलावाचे. स्थानिक जाणकारांच्या मतानुसार गेल्या १० वर्षात तलावाच्या पाण्याच्या पातळीत खूप घट झाली आहे कारण तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अतोनात जंगलतोड झाल्याने तलावात गाळ साचण्याचे प्रमाण खूप वाढले आहे आणि जलपर्णीची वाढही बरीच झाली आहे. गेल्या १० वर्षातील जीव सृष्टीत झालेल्या बदलांमध्ये तलावात माशांची बिजावणी सोडण्याची सुरुवात केल्याने माशांचे उत्पादन बरेच वाढले आहे आणि जलपर्णी वाढल्याने भ्रमंती करणा-या पक्ष्यांनी ब-याच मोठ्या संख्येने येथे येणे सुरू केले आहे. पण सरपणासाठी पुर्वी तलावाच्या काठावर उपलब्ध असणा-या वनस्पती फार कमी झाल्या आहे. या कारणांमुळे पक्ष्यांचे शिकारी ह्या हितसंबंधी गटाचा फायदा झाला आहे, पण त्याच वेळी स्थानिक शेतक-यांना नुकसान सहन करावे लागत आहे, कारण पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होत नाही. काही लोकांनी मत्स्य पालनासाठी हा तलाव लिलावावर घेतल्याने त्यांचा फायदा होतो आहे. आधी तलावापासून मिळणारा ‘सिंचनासाठी पाणी' हा लाभ कमी झाला असून मासे नावाचा लाभ वाढला आहे. स्थानिक लोकांच्या मतानुसार व स्थानिक डॉक्टर्सच्या माहितीवरून तलावामुळे गेल्या काही वर्षात डासांचे प्रमाण खूप वाढले आहे व चिकनगुनीया, हिवतापाचा प्रादुर्भाव वाढला आहे. विरपुरः तक्ता क्र. १० भूभागातील बदल १) भूभागाचे अनुक्रमांक २) भूभागाचे स्थानिक | लाल पिपी सपाटी । नाव