पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

म्हैसमाळ ठाकरवाडीचा डोंगर या वस्ती व कसत असलेल्या जमिनीला लागून आहे. डोंगरावरील पाणी व माती पावसाळ्यात वाहून मोया प्रमाणावर धूप होत असे. जमिनीत पाण्याचे लोंढे आल्याने पिकाचे नुकसान होत असे. ही धूप व नुकसान टाळण्याकरीता ह्या ६५ कुटुंबांनी मिळून सामूहिकरीत्या चर खणले आहेत. सामूहिकता हि ठाकुरवाडीची संस्कृती आहे. ह्याच भावनेतून जंगल लागवड संवर्धन व विकासाचा आराखडा सादर करीत आहोत.


- - = = = - - - -


- - --


  • वनप्रदेशातील महत्वाच्या जीवजाति नोंदवणे [तक्ता ४] वनाधिकार कायद्यानुसार आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक ग्रामसभेने स्वत:च्या परंपरेप्रमाणे त्यांच्या उपयोगातील गौण वनोपज व जलचरांची यादी पुरवायची आहे. या खेरीज ग्रामसमाजावर वन्य जीवांचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे. शिवाय त्यांना काही उपद्रवी जीव जाती, उदा. बेशरम सारखी वनस्पति नियंत्रणात आणावयाची असेल. त्यासाठी त्यांना व्यवस्थापन योजना बनवायची आहे. ह्या उद्दिष्टांसाठी हा तक्ता बनवला आहे.

ह्या तक्त्यात लोकांना ज्या जीवजातींवर (उदा. करटुली, कडूरकंद, वेत, आवळा, कालवे, वांब मासे) किंवा जैविक संसाधनांवर (उदा.चराई, सरपण) आपला हक्क प्रस्थापित करावयाचा आहे, अथवा ज्यांचे नियंत्रण करणे महत्वाचे आहे (उदा.जलपर्णी, रान डुक्कर) अशा सर्व जाती/ प्रजातींची तसेच जैविक संसाधनांची माहिती भरावी. उदाहरणादाखल मेंढा लेखातील मोहा ह्या जातीची माहिती बघू या. स्थानिक गोंडी भाषेत याला इरपी म्हणतात, मराठीत मोहा. ह्याचे शास्त्रीय नाव मधुका इंडीका आहे. जीवाचे शास्त्रीय नाव ही माहिती शक्य झाल्यास विशेषज्ञांच्या मदतीने जमेल तशी नोंदवावी. मोहाच्या उपयोगांची यादी लांबलचक आहे; हे अन्न म्हणून, बियांपासून तेल काढण्यासाठी, पानांपासून पत्रावळी बनवण्यासाठी, पूजेसाठी वापरात आणतात. ह्या पासून कोणताही उपद्रव नाही. ही प्रजाति जेथे जेथे आढळते त्या भूभागांची स्थानिक नावे, उदा. म्हसोबाचा डोंगर व कुडूचा माळ, ह्यांचा उल्लेख करावा. विरपुर तक्ता क्रः ४ सामूहिक वन प्रदेशातील महत्वाच्या जीवजाती अ.क्र. 9 | E आकले जीवाचे स्थानिक | चार नाव