पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ | गोरा फ़ोकाया पवार । २९/७/८ | ३०/८/८ वनौषधींची माहिती

  • सामूहिक वनक्षेत्राचा इतिहास नोंदवणे [तक्ता ३.१] सामूहिक वनक्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी या क्षेत्राचा इतिहास लक्षात घेणे जरुरीचे आहे. उदाहरणार्थ, ह्यातील काही क्षेत्र पूर्वी निस्तार हक्कांसाठी मान्य केलेले असेल. काही क्षेत्र संयुक्त वन व्यवस्थापनाचा भाग असू शकेल, व त्यासाठी वन खात्याबरोबर काही तोंडी किंवा लेखी करारनामे झाले असतील. ही सर्व माहिती नोंदवावी. ।

ॐ संबंधित समाजांचा इतिहास नोंदवणे [तक्ता३.२] सामूहिक वनक्षेत्राबरोबरच लोकसमाजांचा इतिहासही लक्षणीय आहे. वनाधिकार कायद्याने अनुसूचित जमातींबरोबरच जे समाज तीन पिढ्या, म्हणजे ७५ वर्षे, वनावर निर्भर आहेत, त्यांना हक्क दिले आहेत. हे हक्क उगीचच अपात्र लोकांना मिळणे योग्य नाही. परंतु जे पात्र आहेत, त्यांना हे हक्क मिळाले पाहिजेत. या दृष्टीने सर्व समाजांचा गेल्या ७५-१०० वर्षांचा इतिहास व्यवस्थित नमूद व्हायला पाहिजे. या समाजांच्या हालचाली, जुन्या वस्त्या उठणे, नव्या वस्त्या बसणे, त्यांच्या उपजीविकेची साधने ही नीट नमूद केली गेली पाहिजेत. या विषयाला अनुषंगून लोकांपाशी जी नैसर्गिक संसाधनांचा उपयोग, गावातले व गावाला भेट देणारे भटके समाज, या विविध समाजांचे व निसर्गाचे नाते, व या समाजांचा व निसर्गाचा इतिहास या प्रकारची माहिती आहे, तिचीही नोंद करावी. - - - - - - - - - - - - तक्ता क्रमांक ३: सामूहिक वनक्षेत्राचा व संबंधित समाजांचा इतिहास; ठाकुरवाडी, औरंगाबाद ठाकरवाडी ही वस्ती साधारणपणे १९७२ ते ७३ च्या आसपास वसण्यास सुरुवात झाली. त्यापुर्वी ठाकर आदिवासी निर्गुडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावठाणांत रहात होते. हे ठाकर आदिवासी परंपरागतरीत्या निर्गुडि म्हैसमाळ तिसगांवच्या जंगलातील वनोपज गोळा करीत असत. त्यावर त्यांची गुजराण चालायची. साखर कारखानदारीचा उदय झाल्यावर ह्यातील ठाकर, भिल्ल, बंजारा, बौध्द, दलित ऊस तोडणी वाहतुक कामगार म्हणुन ऑक्टोबर (दसरा) ते मे-जून (मृग नक्षत्र) ह्या कालखंडात स्थलांतर करु लागले. हा सर्व समाज जंगलात रहात असला तरी भूमिहीन होता. १९७२-७३ च्या दुष्काळात हा सारा समाज रोजगार हमी योजनेवर व दुष्काळी कामावर जावू लागला. ह्या