पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • शेजारील गावसमाजांशी विचारविनिमय करून आपल्या

गावसमाजाने सामूहिक वनसंपत्ती म्हणून दावा करावयाचे क्षेत्र ठरवणे. हे गावाचे सामूहिक वनसंपत्ती, तसेच पुढील कामासाठी अभ्यास क्षेत्र राहील [नोंदणी तक्ता १ - अभ्यास क्षेत्र] । अनेक वेळा निरनिराळ्या गावांतील लोक एकाच सामूहिक वनक्षेत्रातील वेगवेगळी संसाधने वापरत असतील. अशा परिस्थितीत परस्पर विचारविनिमयाने तडजोड करून निदान कायद्याच्या संदर्भात प्रत्येक गावासाठी स्वतंत्र सामूहिक वनक्षेत्र ठरवण्याची नितांत गरज आहे. नाही तर तुला नाही, मला नाही, घाल कुत्र्याला “ अशी परिस्थिती निर्माण होऊन कोणालाच सामूहिक वनसंपत्तीचा लाभ होणार नाही असा धोका उद्भवतो. सामूहिक वनसंपत्ती क्षेत्राची माहिती ह्या पहिल्या तक्त्यात भरावी. भांदरी, पंचायत कोहोना, तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावती : तक्ता १ - अभ्यास क्षेत्र | अभ्यास स्थळाचे नाव भांदरी | माहिती गोळा करण्याची सुरुवात दि. ०१/०७/०८ | m | माहिती गोळा करण्याची अखेर (दिवस / महिना | दि. २९/०७/०८ / वर्ष) | वाडी / गाव / मोहल्ला / शहराचे नाव भांदरी | पंचायत / नगरपालिकेचे नाव कोहाना | u अभ्यास क्षेत्रातील मुख्य पोस्टाचा पिन कोड ४४४८०७ | 9 तालुका चिखलदरा | जिल्हा अमरावती ७ | ० राज्य महाराष्ट्र | ॐ सामूहिक वनसंपत्ती क्षेत्राचा नकाशा बनवणे प्रकरण ५५.४.१ तील {तक्ता गः वन जमिनींच्या सामूहिक हक्कांसाठीच्या दाव्याचा अर्ज भरण्याबाबत सूचना मध्ये सुचवल्याप्रमाणे सामूहिक वनहक्कांसाठी दावा करताना