पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येतं. शेतकऱ्यांच्या बाबतीतही हेच झालं. सूट-सबसडी देऊन त्यांच्यादेखील एक 'सायी'चा वर्ग तयार करण्यात आला. या 'सायी'च्या वर्गाला खुष केल्यानंतर हा वर्ग शेतकऱ्यांना विकायला तयार झाला! स्त्रियांच्या बाबतीतही हेच झालं. ज्या थोड्या स्त्रिया शिकल्या, ज्यांना नोकऱ्या मिळाल्या, ज्यांच्याकडं बोलण्याचं कौशल्य होतं, ज्यांना परिषदा किंवा परिसंवाद आयोजित करण्यासाठी निधी मिळाला त्या पुरुषवर्गाला फितून बनल्या!
 राखीव जागा उपयोगी आहेत, की नाहीत याबद्दल आमच्या मनात मोठा संशय आहे. राखीव जागांच्या सवलतीनं एखाद्या गटास सामाजिक न्याय मिळण्यास मदत होते किंवा नाही याबद्दल आमच्या मनात जबरदस्त शंका आहे; तरीही आम्ही त्याला विरोध करीत नाही. मला कुणीतरी विचारलं, की तुम्ही मंडल, शिफारसींना विरोध करता का? मी म्हणालो. मी मंडल शिफारसींना कधीही विरोध केला नाही. कारण मंडल शिफारसींना विरोध करणं हे माझ्या अभिरुचीला सोडून आहे. माझ्या नैतिकतेच्या सौंदर्याच्या कल्पनेला ते सोडून आहे. म्हणून मी विरोध करीत नाही. मंडल शिफारशींचा काहीही उपयोग नाही, हे मला माहीत आहे, तरीसुद्धा मी त्याला विरोध करीत नाही. त्याचं कारण मी एका लहानशा गोष्टीतून समजावून सांगतो.
 एका आईला दोन मुले आहेत. त्यापैकी एक लंगडं आहे. पोलिओ झाल्यामुळं त्याला एक पायाने चालता येत नाही. दुसरा मुलगा सशक्त आहे. तो सगळा कारभार बघतो,आईला मदत करतो, त्याला असं वाटतं, की आपली आई अपंग मुलास नेहमी जवळ घेऊन बसते, त्याचंच कौतुक करते. त्याच्या पायाला औषध लावल्यानं तो काही बरा होणार नाही. तरीही तो मुलगा तळमळू लागला, कण्हू लागला, की आई त्याच्या पायाला अमृतांजन किंवा काहीतरी बाम वगैरे लावत बसते. त्यानं काही त्याचा पाय बरा होणार नाही; पण तरीदेखील, "आई, बाम कशाला त्याच्या पायाला लावत बसलीस?" असं सशक्त भावानं म्हणणं हे सदूअभिरुचीला कारणामुळं मी मंडल आयोगाला विरोध करायचं टाळलेलं आहे.
 बऱ्याच जणांना कदाचित माहीत नसेल; पण माझे वडील कोल्हापूरमध्ये वार लावून, माधुकरी मागून शिकले. इतक्या गरीब घरात जन्माला येऊनही मला शिक्षण करण्यात जातीचा फायदा मिळाला. जातीचा फायदा म्हणजे माझ्यात काही जीन्स वगैरे आले असा नाही; पण मी घरात लहानपणापासून काय पाहत होतो? माझी आई सोमवारी किंवा एकादशीच्या दिवशी शिवलीलामृताचा

पोशिंद्यांची लोकशाही / १६६