Jump to content

पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आघाड्यांचीच सरकारं आहेत आणि आघाड्यांची सरकारं असूनसुद्धा त्यांनी प्रगती करून दाखवली. जपानमध्येही आघाड्यांची सरकारं आहेत. इटलीमध्ये आघाडीचं सरकार आहे. फ्रान्समध्ये आघाड्यांची सरकारं आहेत. आघाड्यांची सरकारं असली आणि परस्परांशी विचारविनिमय करून मार्ग काढण्याची बुद्धी असली तर देशाची प्रगती होते.
 १९९७ मध्ये आपलं संयुक्त आघाडीचं सरकार कोसळलं, ते संयुक्त होतं म्हणून नाही; त्याचं कारण असं, की ती आघाडीच नव्हती. त्या सरकारमध्ये एका टोकाला आर्थिक सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत असं म्हणणारे पी. चिदंबरम होते आणि दुसऱ्या टोकाला अजिबात आर्थिक सुधारणा होता कामा नयेत, असं म्हणणारे ज्योती बसू आणि कम्युनिस्ट होते. अशी सगळी मंडळी एकत्र आली आणि डाव्यांनी त्याचा फायदा घेतला. बदल होऊ दिले नाहीत आणि म्हणूनच सरकार कोसळलं, संयुक्त आघाडीचं सरकार कोसळलं याचा अर्थ असा नाही, की आघाडी सरकारचा प्रयोग फसला. याचा अर्थ असाही नाही, की कोणत्यातरी एका पक्षाचं जबरदस्त बहुमत आणून, एकगठ्ठा बहुमताचं सरकार तयार केलं, की देशाचं भलं होतं. ही कल्पना काही खरी नाही.

(६ जुलै २०००)

◆◆

पोशिंद्यांची लोकशाही / १६१