पान:तुतीपासून रेशीम.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७७ पडत असतो, हें खरें. पण कृतीनें तेथें अतिशय चांगल्या तन्नें किडे पाळतां येणें कांहीं कठिण नाहीं. तेथें पावसा- ळ्यांत मुख्य अडचण ही कीं, त्या वेळीं तेथील हवा दमट असते; व दुसरें एकसारखा पावसाचा वर्षाव होत असल्यानें लाग- वडीचा पाला हमेपा पाण्यानें थबथबलेला राहील, व असा पाला किड्यांनीं खाल्यास त्यांना ( ग्लॅसरी ) बिलोरी रोग होईल. या शिवाय दुसन्या कांहीं अडचणी आहेत, असें आह्मांस तरी निदान वाटत नाहीं. घरांतील हवा दमट असल्यानें, किड्यांस घातलेला पाला जरी सुकत नाहीं, व बराच वेळ तो ताज्या पाल्या सारखा राहू शकतो, तरी पण कचित् प्रसंगी पाल्यावर असलेला पाण्याचा ओलसरपणाचा अंश न वाळल्यानें किड्यांचे पोटांत पाल्याबरोबर जाण्याचा तो संभव असतो. किड्यांचे पोटांत पाणी गेल्यानें त्यांना बिलोरी रोग होतो. पावसा- ळ्यांत लागवडीवर एकसारखें पाणी पडत असल्यानें लागवडींतून पाला आणतांना तो भिजलेला असतो. असला भिजलेला पाला किड्यांनीं खाल्यास त्यांस बिलोरी रोग होऊन किडे मरतात. ह्मणून पाल्यावरील पाण्याचा अंश पंख्यानें वारा घालून सुकवून नंतर किड्यांस घालावयाचा असतो. पण समयीं पाल्यावर ओलसरपणा तसाच राहिल्यास तो किड्यांचे पोटांत जाऊन किड्यांस अपायकारक होतो. व असे प्रसंग वारंवार घडण्याचा संभव असल्याने वेळीं नुकसान सोसावें लागतें.