पान:छन्दोरचना.djvu/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Կ83 वास्तववादी, प्रत्यक्ष प्रखर सृष्टीची आठवण करून देअील अशी नसावी, ती गद्याच्या भाषेहून भिन्न, अद्वतरम्यसूचक असावी असा जेव्हा आपला हेतु असतो तेव्हा यमक हें पद्याप्रमाणेच आपल्याला व्यवहाराच्या सहा-यापासून दूर काव्याच्या काश्मीरांत नेश्रुन सोडण्यास झुपयोगी पडतें. पद्याप्रमाणेच यमक हें कित्येकदा नवनवे वाक्प्रयोग आणि कल्पना सुचायला कारणीभूत होतें. पुन्हा काव्याची रचना जर पद्यांत करावयाची आहे तर कडव्याची विशिष्ट बान्धणी प्रतीत करून द्यायला यमक, चरणान्त्य यमक हैं फार अपयोगी पडतें. सुनीत म्हणजे केवळ साडेतीन श्लोक नव्हेत तर तें अष्टपदी नि षट्पदी, अथवा तीन चतुष्पद्या आणि त्यांची ओकत्र बान्धणी करणारी अन्त्य द्विपदी मिळून होतें याची जाणीव करून द्यायला यमकाच्या बान्धणीचा चाङ्गला झुपयोग होतो. तथापि सयमक पद्य म्हणजे काव्य हें समीकरण कोणत्याहि रासिकास मान्य होणार नाही. 'औडक चौडक दामाडू, दामाडूचे पद्धाडू' अशा सयमक आणि पद्यरूप तथापि निरर्थक बाळबोलांनी बाळांनाच आनन्द व्हायचा. समज्ञस मनुष्याला यांत काहीच हृद्रम्य वाटणार नाही. तरी यमकाच्या चमत्कृतीने दिपून नीरस पद्यालाच काव्य म्हणून कवळणारे आणि सरस काव्याला निर्यमक म्हणून झिडकारणारे काही विद्वान् आढळतात. त्यांच्या डोळ्यांना आणि कानांना यमकाची आितकी सवय झालेली असते की मराठी निर्यमक काव्य पहातांक्षणी ते बुजतात, यमक हैं आज मराठी कावतेचें सौभाग्यचिन्ह होअन बसलें असलें तरी तें साक्षात् सौभाग्य नव्हे हें विसरतां कामा नये. तें अपरिहार्य नाही आणि त्याची शोभाहेि सापेक्ष आहे. सयमक रचना करावी की नाही हा प्रश्न जसा वैयक्तिक प्रकृतीचा तसाच सामाजिक रूढीचा आणि अभिरुचीचा आहे. संस्कृतांत बाणाच्या गद्यरूप कादम्बरीसहि काव्य मानतात, आणि पद्य हें प्राय: निर्यमक असतें; फासींभाषेत गद्यसुद्धा सयमक रचण्याकडे शेकडों वर्षे प्रवृत्ति होती. रेन्दाळकरांनी निर्यमक पद्य रचण्यांत संस्कृत वाङमयांतील रूढीकडे परावर्तन केलें; राम गणेश गडकरी यांनी राजसंन्यासांतील सयमक गद्य लिहिण्यांत झुर्दू नाटकांतील पद्धतींचें अनुकरण केलें. यमकचतुर मोरोपन्ताने भगवद्रीतेचें भाषान्तर जसे पूर्वीच