पान:छन्दोरचना.djvu/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना < चरणाच्या अन्तर्गत घटनेचा विचार केला पाहिजे, दोन चरण सममात्रक असूनहि अन्तर्गत घटनाभेदामुळे भिन्न होोंधूं शकतात या गोष्टीचा कोणाला पत्ता लागलेला नव्हता. मी या जातिरचनेचा अभ्यास आरम्भिला आणि ख्रिस्त शके १९२२, जानेवारी ८ या दिवशीं येथील शारदामन्दिरांत * नवीन चलनी वृतें' या विषयावर ओक निबन्ध वाचला. तो नन्तर मी विविधज्ञानविस्तारमासिकाकडे पाठविला असतां सम्पादकांनी त्याला स्थान देअधून मला श्रुतेजन दिलें, ज्ञानकोशकारांनीहि हा लेख आपल्या ज्ञानकोशांत समाविष्ट करून माझा ओकप्रकारें गौरवच केला. या गुणग्राहकांचा मी फार आभारी आहे. 'पुढे छन्दांचाहि मी थोडा अभ्यास केला आणि डॉ. केतकर यांच्या अध्यक्षतेखाली येथें भरलेल्या शारदोपासकसम्मेलनांत छन्दावर ओक निबन्ध वाचला तोहि अध्यक्षांना मनोरञ्जक अाणि क्षुत्तेजनार्ह वाटला. परन्तु ग्रन्थनिर्मितीच्या दृष्टीने खरें झुप्तेजन अकल्पितपणें निराळ्याच ठिकाणाहून मिळाले. फर्म्युसनू कॉलेजांतील संस्कृतविषयाचे प्राध्यापक डॉ. वासुदेव गोपाळ परान्जपे, ओमू. ओ., ओलुओलू. बी., डी. लिट्., यांनी आर्यसंस्कृतिमुद्रणालय नुकतेंच स्थापिलें होतें आणि त्या मुद्रणालयांतून गम्भीर विपयांवरील पुस्तकें त्यांना प्रकाशित करावयाचीं होती. मी असें ओखादं पुस्तक लिहून देअंधूं शकेन का म्हणून त्यांनी प्रश्न टाकितांच मी छन्दःशास्त्रांतील जातिविचार हा विषय चालेल का म्हणून झुलट प्रश्न केला. त्यांच्याकडून होकारार्थी श्रुत्तर तत्काळ येतांच मी कार्याला आरम्भा केला. पुस्तक अितर दृष्टींनीहि विद्याथ्र्यांच्या आणि कवींच्या झुपयोगी पडावें म्हणून त्यांत वृत्तविचारहि समाविष्ट केला, अरबीफासीं वृत्तेहि घालण्यांत आलीं आणि शेवटीं, ज्याचा छन्दःशास्त्राशी काही सम्बन्ध नाही पण काव्याशी आहे अशा * पद्याची भापा ” या विषयाचीहि चर्चा करण्यांत आली. ओक वर्षीच्या अवधींत पुस्तक लिहून छापून होॠन ते खिस्तशके १९२७ मध्ये प्रकाशित झालें! प्रकाशनाचें आश्वासन न मिळतें तर ही ग्रन्थनिर्मिति न होती. तेव्हा या ग्रन्थावें योग्य तें श्रेय डॉ. परान्जपे यांनाच दिलें पाहिजे. तो काल विशेषत: पद्यरचनेचा असल्याने ग्रन्थाला मागणीहि चाड्गली आली आणि हा गम्भीर साहित्याला आश्रय देण्याचा प्रयत्न आश्रयदात्यांना भोवला नाही हैं त्यांचें आणि माझें सुदैवच समजलें पाहिजे.