पान:छन्दोरचना.djvu/583

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना “ጻጻo लिहिणारांची प्रवृत्ति स्वतन्त्र दिसतच नाही. नवीं नवीं नावें देण्यामध्ये असेल तें स्वातन्त्र्य व्ययेित होअी. कनकप्रभा, विबुधप्रिया इत्यादि वृत्तांना निरङ्खनमाधव मत्तहासिनी, मच्छिका हीं नांवें देतो, पण आधार देत नाही. एखाद्या दक्षिणात्य छन्दःशास्त्रकाराचा त्याला आधार असावा; कारण विबुधप्रिया वृत्ताला नागवर्म मछिकामाला म्हणतो आणि मन्दारमरन्दचम्पूचा कर्ता कृष्णकवि हा मलिका म्हणतो. पण अमृतध्वनि वृत्ताला मन्दारमरन्दचम्पूकार मतेभ म्हणत असतांहेि निरञ्जनमाधव कल्पालतिका हें नांव देतो. मधुमती, कमला, भामिनी, सहदळा (?), कनकलता, मदनसायक, हेमकला, कामकला आणि सुधा हीं नऊ वृतें तो नवीनच देतो; पण आधार साङ्गत नाही. महाराष्ट्रसारस्वतकार म्हणतात, “जुन्या कवींपैकी निरङ्खनमाधव (सद्वृत्तमुक्तावलीकार ), रङ्गनाथ कावेरीकर ( वृत्तसुधाकार ), मुकुन्द (छन्दोरत्नाकरकार), विठ्ठल (विद्वजीवनकार? ) वगैरेचे * ग्रन्थ हल्ली आपणांस उपलब्धहि आहेत पण त्या सर्वांत, नव्हे, आजमितिपर्यन्त छन्दःशास्त्रावर रचलेल्या सर्व मराठी ग्रन्थात छन्दोमञ्जरीइतका सुन्दर ग्रन्थ ओकहि नाही.' २० रामचन्द्र दैवज्ञाची छन्दोमञ्जरी रामचन्द्र जोशी याने छन्दोमञ्जरी नांवाचा जी विस्तृत ग्रन्थ केला आहे तो वे. रङ्गाचार्य रडुी शास्त्री यांनी सम्पादून प्रकाशित केला आहे. हा ग्रन्थ रामजोशाने नव्हे तर रामचन्द्र दैवज्ञ याने रचिला आहे. या ग्रन्थांत मात्रापद्यांचा विचार केलेला नाही. वृत्तांचीं झुदाहरणें मात्र सरस आहेत. हीं झुदाहरणें रचतांना चौथ्या चरणांत वृत्ताचें नांव तर ग्रथित केलें आहेच परन्तु गणवाचक वर्ण पद्यांतील प्रथम चरणांत गणारम्भीं कोणींहि आजपर्यन्त आणून दाखविले नाहीत. ती बिकट कामगिरी रामचन्द्र दैवज्ञाने करून दाखविली आहे. यापलीकडे या ग्रन्थांत विशेष काही नाही. २१ वृत्तदर्पण परशुराम तात्या गोडबोले यांचें वृत्तदर्पण हें शालेय पुस्तक सुपरिचितच

  • महाराष्ट्र सारस्वताच्या १ ल्या आवृत्तीच्या शेवटीं जी ग्रन्थसूची दिली आहे तिच्यांत प्राणकृत * बावनी छन्द ? आणि गिरिधरकृत ' छन्दोरामायण ” हीं दोन ग्रन्थांचीं नांवें अधिक आढळतात.