पान:छन्दोरचना.djvu/581

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ԿԿ« एका लेखकाच्या हातून झालेली नसेल, आणि वेळोवेळीं या ग्रन्थांत भर पडत आली असेल, असेंहि या ग्रन्थाविषयी एक मत आहे. झुपजातीचे चौदा प्रकार कल्पून त्यांना नांवें दिलेलीं (प्रापै २॥१२१) प्रथम वृत्तलक्षण साङ्गतांना या ग्रन्थांत विरहाङ्काच्या पद्धतीसारख्या प्राकृत पद्धतीचा अवलम्ब केलेला आहे. शालूर, नरेन्द्र, गीता, मालाधर, निशिपालक इत्यादि वृतें प्रथम प्राकृत पैङ्गलांतच आढळतात; पण आश्चर्याची गोष्ट ही की शिखरिणी वृत्ताला यांत थारा नाही ! स्वतःचीं नवीन नांवें वृत्तांना देऊन घोटाळा वाढविण्याचें कार्य प्राकृत पैडुलानेहि केलें आहे; आणि दोधक नि शार्दूलविक्रीडित या वृत्तांचींच लक्षणें पुन्हा एकदा निराळ्या शब्दांनी साङ्गून त्या वृत्तांना अनुक्रमें बन्धु आणि * सद्लसट्टा ' म्हटलें आहे ! प्राकृत उदाहरणें पाहतां अन्तर्गत यमकांवरून यतिविवेचन करायचें अवश्य सुचायला हवें होतें पण तें झालें नाही. त्यामुळे झुदाहरण पाहतां ज्या ब्रह्मरूपकाची मोडणी प्राकृत पैङ्ग लांत (प्रापै २१७५ ) [ - I - - - - । - - - - I - - - - I - - - ।] अशी स्पष्टपणें दिसते त्याच वृत्ताची मोडणी प्राकृत पैङ्गलावर आधारलेल्या वाणीभूषणांत [। --- - । - - - - । - - -- I - - --.] अशी आढळते ! १७ गङ्गादासकृत छन्दोमञ्जरी गङ्गादासकृत छन्दोमञ्जरी हा ग्रन्थ वृत्तरत्नाकरासारखाच सुपरिचित आहे. झुद्रता, भुजङ्गप्रयात, मणिगुणानेकर, शालिनी नि रुचिरा या वृत्तांची लक्षणसूत्रे गङ्गादासाने झुत्पलावरून घेतलेलीं दिसतात. काही लक्षणसूत्रे केदारभट्टाचींच घेतलेली आहेत. कांही त्यानें स्वतः रचलेलीं आहेत. केव्हाकेव्हा मूळ सूत्रांत थोडी सुधारणा करून तो तें घेतो. या ग्रन्थाचे सहा स्तबक आहेत. याच्या सहाव्या स्तबकांत तीन गद्यप्रकार वर्णिले आहेत हा या ग्रन्थाचा विशेष होय.

    • अकठोराक्षरं स्वल्पसमासं ‘चूर्णकं? विदुः । तत्तु वैदर्भरीतिस्थं गद्यं हृद्यतरं भवेत् ॥ भवे'दुत्कालका"प्रायं समासाढयं दृढाक्षरं। वृत्तैकदेशसम्बन्धाद् *वृतगन्धि? पुनःस्मृतम्” ॥