पान:छन्दोरचना.djvu/572

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने VAR, छन्दःशाख्ाचा अितिहास वेश तो या अध्यायांत करीत नाही. त्याचप्रमाणे (वबू ३३॥२५॥२८) हे श्लोक सुकामिनी वृत्तांत (। - ७ - ७ । - ७ -) असून, (ववृ ३३॥२९ आणि ३६l८) हे दोन श्लोक [॥ ७ ७ ७ ७ - - ॥ ७ ७ - --]] या वृत्तांत असून त्यांचा उछेख कोणत्याहि छन्दःशास्त्रज्ञाने केलेला नाही. दण्डकाचींहि त्याचीं तीन उदाहरणें (वबू १२॥६,८८॥१,१०३॥६१) असून त्याच्या तिस-या म्हणजे सानन्द दण्डकाच्या एका चरणांत १०२ अक्षरें आहेत ! वराहमिहिराच्या बृहज्जातकांतील (२३/४) हा श्लोक [-- ७ - ! ७ ७ ७ ७ - ७ - ~--]] या अभिनव वृत्ताचा आढळतो; तसेंच (२८/३) या शालिनी वृत्तांतील श्लोकाच्या * निर्याणं स्यान्नष्टजन्मदृकाणः ? या दुसञ्या चरणांत ऋकारयुक्त व्यञ्जनापूर्वील अक्षरास गुरुत्व आलें आहे ही गोष्ट चिन्तनीय आहे. ४ अग्रेिपुराण आग्रेपुराण या ग्रन्थाच्या ३२८-३३४ या अध्यायांत छन्दोविवेचन आहे. पिङ्गलोक्त परिभाषेचा अवलम्ब आहे. विशेष काही नाही. मुद्रित आवृत्तीत अशुद्धे फार आहेत. ५ कालिदासकृत श्रुतबोध श्रुतबोध या पुस्तिकेंतील विसावा म्हणजे अिन्द्रवज्राविषयीचा श्लोक हलायुधाने (पि ९८) झुध्दूत केला आहे त्यावरून श्रुतबोध हलायुधाच्या पूर्वीचा असला पाहिजे. या बेचाळीस श्लोकांच्या ग्रन्थाचा कर्ता कालिदास हा रघुवंशकार कालिदासाहून वेगळा असावा. हा पिङ्गलोक्त परिभाषेचा झुपयोग करीत नाही. हा भारताच्याच पद्धतीचा अवलम्ब करितो; पण वृत्तलक्षण अनुष्टुभू श्लोकांत न साङ्गतां त्याच वृत्तांत माण्डतो; आणि यतिहि साड्गतो. यदि प्राच्यो हृस्वः कमलनयने पञ्च गुरवस्ततो वर्णाः पञ्च प्रकृति सुकुमाराङ्गि लघवः । त्रयोऽन्ये चेोपान्त्याः सुतनु जघनाभोगसुभगे रसैरुद्रैर्यस्यां भवति विरतिः सा शिखरिणी ॥ (श्रुबेो ३९) यति (“रसैरुद्रः') मात्र पिङ्गलोक्त परिभापेने साङ्तिलेला आहे. याच सुधारलेल्या पद्धतीचा अवलम्ब नाट्यशास्त्राच्या अपलब्ध आवृत्तींत अनेक ठिकाणीं आढळतो.