पान:छन्दोरचना.djvu/567

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने अध्याय ८ का छन्दःशास्त्राचा त्रोटक इतिहास १ पिङ्गलार्चीं छन्दःसूत्रे छन्दःशास्त्राचा पाया कोणों घातला हैं निश्चयाने साङ्गतां येत नाही. ‘छन्द’ या शब्दाप्रमाणेच 'पिङ्गल? हें नांव प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. परन्तु छन्दःसूत्रांचा कर्ता म्हणून जो पिङ्गल आपल्या परिचयाचा आहे त्याच्यापूर्वी काश्यप, सैतव, रात, माण्डव्य हे छन्दोविवेचक होऊन गेले असें पिङ्गलाच्याच ७॥९-१०, आणि ७॥३४ या सूत्रांवरून कळतें. त्यांच्या कृती उपलब्ध नाहीत. पिङ्गलाचें छन्दःशास्त्र मात्र प्रसिद्ध आहे. पिङ्गलाने केवळ सूत्रे दिलीं आहेत आणि तीं पाणिनीच्या अष्टाध्यायीप्रमाणे आठ अध्यायांत विभागलेलीं आहेत. वैदिक छन्द, तनुमध्या या षडक्षरी वृत्तापासून चण्डवृष्टिप्रपात या सत्तावीस-अक्षरी दण्डकापर्यंत काही लौकिक वृतें, आणि वैतालीयादि काही अर्धवट जाती यांचा विचार पिङ्गलाने केला आहे. इतर दण्डकांची बोळवण तो 'शेषः प्रचित इति” (पि ७/३५) या एकाच सूत्राने करतो. जीं वृतें नामनिर्देशाने प्रसिद्ध नव्हतीं पण प्रयोगारूपाने आढळलीं त्यांचा परामर्श त्याने गाथाप्रकरणांत घेतला आहे; परन्तु प्राकृतांतील पद्यांचा त्याने विचार केलेला दिसत नाही; आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणींहि वैदिक छन्दांचा विचार केला नाही. पिङ्गल हा छन्दःशास्रांतील आाद्य सूत्रकार दिसतो. त्र्यक्षरी गणांना म-य- र-स-त-ज-भ-न, नि लघुगुरूंना ल-ग संज्ञा देऊन, आणि यतिस्थानें साड्गण्यासाठीं चारपांच इत्यादि अङ्गांसाठी समुद्रकामशरादि संज्ञा योजून त्याने वृत्तांचीं लक्षणें सूत्रबद्ध करून टाकिलों. या सूत्रांवरून वृत्तांतील अक्षरांची सङ्ख्या, लगक्रम आणि यति यांचा अचूक बोध होतो; जसें, *शिखरिणी य्र्मी न्सौ भ्लौ गू ऋतुरुद्राः ” (पि ७l२०), पिङ्गलापूर्वी यति मानीत नसत याचा अर्थ पादान्तर्गत यति मानीत नसत ओवढाच केला पाहिजे. पादान्त्य यती