पान:छन्दोरचना.djvu/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने काही छन्दोविषयक प्रक्ष ܟ परन्तु ओका पद्यांतील चार-अक्षरी तुकडा म्हणायला ओखाद्याला जितका वेळ लागतो तितकाच वेळ दुसरा कोणी दुसरें पद्य म्हणतांना तीन-अक्षरी तुकड्यासाठीहि घेणूं शकेल. म्हणजे काय, सारीं अक्षरें जरी सारख्याचवेळांत झुचारायचीं असलीं तरी ओकाला ओका पद्यांतील ओक अक्षर झुधारायला लागणारा वेळ हा धिक असू शकेल. मग कालमापनाचें काही परिमाण निश्धित करितां येअील की नाही ? येऔील; पण तें परिमाण त्या त्या म्हणणा-यापुरतें आणि पद्यापुरतें मर्यादित राहील, मग परिणाम हैं व्यक्तिनिरपेक्ष कसें होऔील ? तसें व्हायला छन्दांत सारींच अक्षरें सारख्या वेळांत झुचारायचीं असतात; तेव्हा, ओक अक्षर झुचारायला लागणा-या काळाला ओक मात्रा कां म्हणूं नये? आणि मागे दिलेल्या पद्यांपैकी पहिल्या पद्याला चतुर्मात्रकावर्तनी आणि दुस-या पद्याला त्रिमात्रकावर्तनी कां गणू नये? तसें करायला सकृद्दर्शनीं काही अडचण दिसत नसली तरी, ओक गोष्ट विचारांत घेतल्याविना गत्यन्तर नाही. । *सारखी किति । वेळ ॥ औकू ये ती । शीळ । केिती मी पा- हिलें । अितकेंची दे- खिलें । झुरांत धड- धडे । धावतां मी । पडे” (तासक ८० ) याप्रमाणे या छन्दांच्या प्राचीन रचनेंत कित्येकदा मध्येच ओका अक्षराच्या ठिकाणीं दोन अक्षरें आढळतात. अर्थातच छन्द कितीहि घाओीने म्हटला, प्रत्येक अक्षर म्हणायला लागणारा वेळ कितीहि आखूड केला तरी तो वेळ, किचित् प्रसड्गीं त्यांत दोन अक्षरें अतिशय दुत, पण म्हणतां येतील अितका घेतला पाहिजे. म्हणजे, अत्यन्त घाओीने म्हटलेल्या अक्षराला जो -हस्वतम वेळ लागेल तो ओक मात्रेचा असें परिमाण कल्पिलें तर छन्दांतील प्रत्येक अक्षर द्विमात्रक होऔल, आण छन्द हे अष्टमात्रकावर्तनी वा षण्मात्रकावर्तनी होतील, "