पान:छन्दोरचना.djvu/403

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Vs १८ ' सूर्यकला' [। प । • + , श्रु । प । • +] समुदितमदनामात्रावली अकराव्या मात्रेनन्तर खण्डित केली कीं जी द्विधा मात्रावली होते तिला सूर्यकला म्हटलें आहे. (१) * जीची आलोचना -० करितां नीरच ये लोचना. धानिक करी वञ्चना -० नेदी तिळभरही काञ्चना.?? (दस्व १८३) तथापेि हें पद्य शिथिल आहे. (२) * सुन्दर नृपमन्दिर तयाच्या सुन्दर सौंधावर रमणी कोणी तरी झुभी ही चारुमूर्ति हांसरी शुक्राची चान्दणी झुतरली जणु अस्मानांतुनी सौंधाच्या कोन्दणी जणू ही लखलखते हिरकणी.” (कास्फू७८) (३) *येझुनि माझ्याकडे ओकदा मृत्यु असें बडबडे,

  • सूर्य अवेळीं किती सारखे जाती अस्ताप्रती !

आकाशांतुने गोल भराभर तुटून खाली पडती भूवर स्वाहा करेितों मी ओकन्दरतेव्हा त्याच्यावरी त्याजला मीही झुत्तर करीं.” १ (भुवा२/२७) श्रुवा (२/४९) ही कविताहि याच जातीची आहे. १९ महाराष्ट्र [- । प । पIप i + ७ ] नृपनीतिविशारद, सदैवसावध, वैराग्याचा कन्द शिव छत्रपाते प्रभु महाराष्ट्रभूप्रिय जनहृदयानन्द बघ शैशवांतही त्यास ओक हिन्दवीस्वराज्यच्छन्द. (२५७) या जाताला (प्रापै १/२०८) मरहट्टा छन्द म्हटलें आहे. हे नाव प्रथम कोणी आणि कां दिलें समजत नाही. या जातींतील अन्त्य अकार निभृत असेल असें वाटतें. तसा तो धरिल्यास या आणि पुढील अरुणप्रभाजातींत काही भेद रहात नाहीं.