पान:छन्दोरचना.djvu/388

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ३६१ जाति-जीवन कवितेची आठवण व्हावी, आणि कवसाह या ग्रन्थाच्या द्वारा त्या पद्याचें शास्त्रशुद्ध स्वरूप समजून घेथून त्याच्याशी आपली रचना ताडून पाहतां यावी यासाठी जातिनामकरण हें वृत्तनामकरणाप्रमाणेच अत्यवश्य आहे. गतेि, आर्यांगीति, दोहा अित्यादि नांवें जातींना प्राचीन काळापासून चालत आलेलीं आहेत, त्याप्रमाणे नवीन जातिप्रकारांना नवनि नावें देण्यांत अनुचित असें काहीच नाही. नावें होतां होऔील तोंवर प्राचीन झुदाहरणांतून, आखूड, सुटसुटीत आणि श्रवणसुभग अशीं निवडून देण्यांत वृत्तनामकरणाच्या प्राचीन पद्धतीचाच अवलम्ब होत आहे. ध्रुवपदाचा जातिनिर्णयाशीं सम्बन्ध नसल्याने विषम' जातात निवडावयाचें नांव कडव्यांतून घेण्यांत यावें हेंच श्रेयस्कर आहे. आता जीं वृत्तनामें निश्चित करण्यांत आलीं आहेत त्यांच्याशी मात्र या जातिनामांचा घोटाळा होऑ देतां कामा नये. मञ्जरी हें नाव ओका वृताचें असल्यानें तें आता [- । प । प । ~ +] या मात्रावलीला देतां येणार नाही. या मात्रावलीला लीलारति नवीन हें नांवच ठेविलें पाहिजे.