पान:छन्दोरचना.djvu/367

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ૨૪૦ न राहिल्यामुळे, चालीचें आणि ध्रुवपदांचें साम्य पाहून कित्येकदा दिशाभूल होते. या परिच्छेदाच्या आरम्भीं दिलेल्या पद्याशी पुढील पद्ये ताडून पहाणें बोधप्रद हे अील.

  • चान्दरात पसरिते पाण्ढरी माया धरणीवरी,

लागली ओढ कशी अन्तरीं. हा तालतरू गम्भीर शान्तता धरी लेथुनी सुधेचें वल्कल अङ्गीं शिरी, कुणि शुचिर्भूत मुनि तपा जणू आचरी. केस पिन्जुनी झुभी निश्चला कोणी वेडीपिशी भासते छाया काळी तशी.” (काचा ३०) या पद्यांत धुवपद नाही. येथे अन्तरा [- । प । प ॥ ७ +] याच मात्रावलीचा आहे पण तो मागील पद्यांतील अन्त-याप्रमाणे [। प। प । प । ७ + ॥ - ७ - । प । ~ +] या संयुक्त मात्रावलीच्या तीन आवृत्त्यानन्तर आणि चौथ्या आवृत्तीच्या पूर्वी असा नसून दोन आवृत्त्यांच्या मध्ये म्हणजे कडव्याच्या पोटांतच आहे. तेव्हा कडव्यांतील चरणांची सङ्ख्या झुणावली म्हणून जातीचा प्रकार निराळा झाला असें मानण्याचें काही कारण नाही. ‘ शैवालाने मला टाकिलें व्यापुनि पुरतेपणीं, गुदमरे जीवहि त्या दडपणीं. धु० बाहेर वाहते वा-याची झुळझुळ लागतां तयाची पुसट कधी चाहुल चलबिचल अन्तरीं करि मजला व्याकुल, परी सुटेना मिठी तयाची बसली जी जखडुनी, गुदमरे जीवहि त्या दडपणीं.” १(यग १०६) या पद्यांत [- । प। प ॥ ७ +] या मात्रावलीची त्रिपदी आहे पण ती कडव्याच्या पोटांत नाही. तसेंच कडव्यांतील अन्त्य चरण 'गुदमरे जीवहि त्या दडपणीं,”हा ध्रुवपदाच्यापैकी आहे. तेव्हा कडव्याच्या घटनेंत त्याचा विचार करितां