पान:छन्दोरचना.djvu/363

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ३३६ गार वायुची झुळुक येशुनी हिरव्या शेतांवरी लोळुनी नाना क्रीडा करी ! बालकवी तों झुठला, बसला ओकान्तीं जाक्षुनी, रङ्गला नितान्त मधुगायनी.' (माक ५७ ) याहून अधिक मोठा झुतारा घेण्याचें कारण नाही. या पद्यांत कडव्यांचे अनुक्रमाङ्क नाहीत; आरम्भीं ध्रुवपदहि नाही. यावरून जातिरचनेंत धुवपद असलेंच पाहिजे असें नाही ही गोष्ट दिसते. या पद्यांत चार समयक द्विपद्या आहेत. द्विपदीचे दोन्ही चरण मात्र सारखे नाहीत. ओक लाम्ब असून ओक आखूड आहे. परन्तु सर्व द्विपद्या पाहतां असें दिसून येतें की सारे विषमचरण सारखे [। प।प । प। ० +] या मोडणीचे असून सारे समचरण सारखे [- ५ - । प। ७ +] या मोडणीचे आहेत. म्हणजे येथे पद्य ओकाच मात्रावलीच्या आवृत्तीने सिद्ध झालेले नसून दोन भिन्न मात्रावली मिळून होणा-या संयुक्त मात्रावलीच्या आवृत्तीने सिद्ध झालें आहे. हा अर्थसम प्रकार आहे. पहिला सम प्रकार होता. ३ ध्रुवपद हें जातिप्रकाराचें निर्णायक नाही. ओखाद्या पद्याची चाल देतांना ती बहुशः आरम्भींच्या म्हणजे ध्रुवपदांतील चरणांची देण्यांत येते. परन्तु कित्येक पद्यांत धुवपदच नसतें; तर कित्येकदा मागे ३३५ व्या पृष्ठावर शुद्धृत केलेल्या गीतगोविन्दाच्या ११ व्या प्रबन्धांत ज्या मात्रावलीच्या द्विपदीचीं कडवीं आहेत त्याच मात्रावलीच्या द्विपदीचें ध्रुवपद आहे. गीतगोविन्दांतील ३, ४, ५, ६, ८, १७, २०, २२ आणि २३ हे प्रबन्ध पाहिलें असतां त्यांतील कडवीं । प। प। प। - +] याच मात्रावलीच्या द्विपदीने सिद्ध झालेलीं आहेत; परन्तु या प्रबन्धांना धुवपदे मात्र भिन्न भिन्न आहेत. झुलटपक्षीं ओका विशिष्ट मात्रावलीचें ध्रुवपद भिन्न भिन्न जातिप्रकारांच्या आरम्भीं आढळतें. तेव्हा ध्रुवपदावरून ओखाद्या जातीचा प्रकार ठरविणें चुकीचें होअील. जातिप्रकारनिर्णय हा पद्याच्या म्हणजे कडव्याच्या घटनेवरूनच केला पाहिजे. येथे आणखीहि थोडा खोल विचार केला पाहिजे. पद्य म्हणतांना आपणांला आवडेल तो भाग आपण घोळून घोळून म्हणतों; परन्तु या घोळण्याचा,