पान:छन्दोरचना.djvu/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने U काही छन्दोविषयक प्रश्न कारण आहे. मुद्रणकलेच्या शोधापूर्वी आणि विशेषतः लेखनकलेच्या शोधापूर्वी, जेव्हा ज्ञानसंरक्षणाचा सारा भार स्मरणशक्तीवर पडे तेव्हा गद्यरचना कचितच होअी. संस्कृतांत वेद, पुराणें, स्मृति अित्यादि ग्रन्थ पद्यांत आहेत आणि आज सुद्धा मराठींत भूगोलव्याकरणाच्या कारिका आढळतात याचें कारण पद्य हें स्मरणसुलभ असतें हैंच होय. सुधारणेच्या प्रगतीसङ्गे गद्याचें क्षेत्र वाढतें; पण पद्याचा प्रपञ्व अगदीच सम्पुष्टांत येत नाही. पद्याचा झुपयोग काव्यापुरता मर्यादित होतो. याचा अर्थ असा नाही की काव्य गद्यांत असू शकतच नाही. काव्य रसात्मक, रमणीयार्थप्रतिपादक पाहिजे ओवढेच साहित्याचार्य म्हणतात. गद्यांतहि रमणीय आन्दोलन असतें. ओखाद्या गद्यगड्गाधराच्या भाषेत, जेव्हा लेखन ओक प्रकारच्या केवळ समाधींतच झालें असावें असें वाटतें आणि भाषा ही कल्लोलिनीप्रमाणे भरपूर, ओढाळ आणि नादवती होते तेव्हा तींत ओक प्रकारचें श्रेष्ठ गूढ आन्दोलन प्रत्ययास येतें. परन्तु हें आन्दोलन अनियमित असतें. तेंच नियमित, आवर्तनात्मक आणि अनुकरणीय होड्यूं लागलें की त्याला पद्याचें व्यवस्थित स्वरूप आलें म्हणून समजावें. ४ पद्याची काव्यानुकूलता काव्य जर गद्यांतूनहि प्रगट होॠ शकतें, आणि गद्य हें जर निवेदनाचें स्वाभाविक साधन आहे तर काव्याला तरी पद्याची आवश्यकता कां असावी ? वाडमयांत जें हृदयङ्गम असर्त त्याचा मनावर खोल ठसा श्रुमटतो. तें वाचतांना आनन्द होतेीच परन्तु तेवढ्याने त्याचा सम्बन्ध सुटत नाही. मनुष्याला तें पुनःपुन्हा मनांत घोळून त्या आनन्दाची पुनरावृत्ति करावीशी वाटते.| तो भावार्थ जर थोडक्यांत आणि पद्यबद्ध असेल तर तो आठवून मनांत धोळणें सोपें जातें. गद्य हैं द्रव मानिलें तर पद्य हैं। केलासासारखें आहे. केलासाच्या आकृतिसैौन्दर्याप्रमाणे पद्याचें बाह्यसौन्दर्य आल्हादकारक वाटते यांत शङ्गा नाही, तरी रसास्वादांत मूलतः काही भेद पडत नाही; पद्य हें गद्याहून अधिक सोयीचें आहे अितकंच. गायनाप्रमाणेच, स्वरांच्या आरोहावरोहाप्रमाणेच लयबद्धता ही भावना झुप्तेजित करण्यास फार झुपयोगी पडते; आणि ती पुन्हा