पान:छन्दोरचना.djvu/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने 8oR वृत्तविचार हें नाव चार वृत्तांना आहे; आणि ओकच नाव दोन तीन निरनिराळ्या वृत्तांना आहे अशी श्रुदाहरणें कितीतरी सापडतील! काही नावांत अन्तर अत्यल्प आहे. मत्ताक्रीडा-मक्तक्रीडा, सुभद्र-सुभद्रा, झुपस्थित-झुपस्थिता, कमल-कमला, ललित-ललिता, वृत्त-वृत्ता यांचा घोटाळा सहज होोंधूं शकेल. ज्या नांवाचे दोन दोन पारिभाषिक अर्थ होअं शकतात तीं नावें योग्य नव्हेत. पण वृत्त हेंच नाव दोन वृत्तांना दिलेलें आढळतें; यमक हेंहि ओका वृत्ताचें नाव आहे ! पड्रित, बृहती, धृति हीं वर्गवाचक नावें वृत्तांनाहि दिलेलीं आहेत; आणि गीतिका हेंहि ओका वृत्ताचें नाव बनलें आहे ! पूर्वी होञ्थून गेलेल्या छन्दःशास्त्रकाराने जर ओखाद्या वृत्ताला ओक नाव दिलें तर त्या वृत्ताला दुस-या छन्दःशास्त्रकाराने आपलें स्वतःचें म्हणून दुसरें नाव देअं नये, सयुतिक कारणावाचून तरी देॐ नये. परन्तु छन्दःशास्त्रांत अगदी विरुद्ध वहिवाट दिसते. ज्या वृत्ताला काश्यपाने सिंहोन्नता हैं नाव दिलें, त्याला जर सैतवाने श्रुद्धर्षिणी म्हटलें तरी चालतें तर पिङ्गलाने आपलें वसन्ततिलका हैं नाव टायला कां भ्यावें ? आणि ही परम्परा यथ तरी काय म्हणून थाम्बावी? ती थाम्बली नाहीच. ' गार्गेण सैव गदिता मधुमाधवीत' असा चौथा चरण प्राकृत पैङ्गलाचा टीकाकार (पृ. ४७४) छन्दःसिद्धान्तभास्करांतून झुद्धृत करितोच! प्रमाणिका, विद्युन्माला, द्रुतविलम्बित, भुजङ्गप्रयात, स्रग्विणी, मालिनी, हरिणी, मन्दाक्रान्ता, पृथ्वी आणि कुसुमितलतावेछिता या नावांनी जीं वृतें पिङ्गलाच्या छन्दःशास्त्रांत सुप्रसिद्ध आहेत त्यांना भरताच्या नाट्यशास्त्रांत अनुक्रमें मत्तचेटित, विद्युलेखा, हरिणीप्लुता, अप्रमेया, पद्मिनी, नान्दीमुखी, वृषभललिता, श्रीधरा, विलम्बितगति आणि चित्रलेखा अशीं नावें आहेत ! नाट्यशास्त्र हैं पिङ्गलाच्या, लौकिक वृत्तांचें विवेचन करणा-या छन्दःशास्त्राहून प्राचीन असावें असें वाटतें; तथापि नाट्यशास्त्राची मूळ विश्वसनीय अशी शुद्ध प्राचीन प्रत अद्यापि झुपलब्ध नाही. पुन्हा, रूढ नावाचें सर्वथैव झुचाटन करणें शक्य नाही आणि अिष्टहि नाही. म्हणून नावें निश्चित करितांना होतां होअील तों प्राचीन ग्रन्थकारास मान दिला असला तरी भरताने दिलेलों नावें स्वीकारण्यापेक्षा पिङ्गलाने दिलेली आणि रूढ झालेली नावेंच बहुतांशी स्वीकारिलीं आहेत.