पान:छन्दोरचना.djvu/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने वृत्तावचार ܐ रीिल) 'विलसतभटकोटि” या दण्डकचरणांत ओकशें अठ्ठयाण्णव अक्षरें आहेत! तथापि येथूनहि सीमा फारच दूर आहे. वृतरत्नाचा टीकाकार नारायण ट्ट पुढील पद्य शुद्धत करितो,-

    • ओकोनसहस्राक्षरपर्यन्ता दण्डकाङ्घ्रयः प्रोक्ताः

वर्णत्रिकगणवृद्धया नद्वितयाद्या महामतिभिः ” (के. पृ. १०६) या ग्रन्थांत वृत्तविस्तार देतांना वृतें चरणाक्षरसङ्ख्येप्रमाणे साड्गण्याची Iाचीन पद्धति स्वीकारलेली नाही. अर्थातच दण्डकाच्या विवेचनासाठी पृथकू |ाकरण दिलेलें नाही. ओका वृत्ताचा दुस-या वृत्ताशी सम्बन्ध काय तो ध्यानांत |ावा म्हणून वृत्तानुक्रम हा लगक्रमसाम्य आणि मोडणीचें साम्य यांच्या भनुरोधाने ठरविला आहे. छन्दःसाम्य हें चरणान्तापासून' चरणारम्भाकडे हात अनुक्रम ठरविला आहे. सङ्ख्याक्रमभेदाने वृत्तप्रकार किती होत्रं शकतील हा वस्तुतः गणिताचा श्न आहे; परन्तुः या प्रस्तारप्रकरणाने छन्दःशास्त्राच्या क्षेत्रांत निष्कारण पाय सरले आहेत. ओकाक्षरी रचनेपासून सव्वीसअक्षरी रचनेपर्यंतच शक्य वृत्तकारांची ओकन्दर सङ्ख्या गणिताने २`-२ म्हणजे ३३,५४,४३० अितकी ोते! परन्तु ओकन्दर झुपलब्ध वृत्तांची सङ्ख्या सहस्रावर जात नाही. वृत्तांत तें वृत्त व्हायला काहीतरी आन्दोलनमाधुरी पाहिजे. छन्द म्हणजे काही लघुगुरूंचा प्रस्तारखेळ नव्हे. ज्या वृत्तांतील आन्दोलन अक्षररचनेकरून सहज प्रतीत होत नाही, ज्यांना तालांत बसवायला थोडे फार परिश्रम पडतात, परन्तु ज्यांपैकी अनेक वृत्तांच्या चाली परम्परया चालत आल्याकारणाने सुकर वाटतात अशा वृत्तांना अनावर्तनी म्हटलें आहे. त्यांचें विवेचन आवर्तनी वृत्तांच्या आधी केलें आहे. कित्येकवृत्तें अशों आहेत कीं तीं सहज (कचित् ओखादें दुसरें अक्षर प्लुत अचारून) आवर्तनी होोंधूं शकतात; परन्तु त्यांच्या परम्पराप्राप्त चाली पहातां तीं अनावर्तनी वाटतात त्यांचें विवेचन आधी अनावर्तनी वृत्तांच्या वर्गात केलें असून पुढे आवर्तनी वृत्तांच्या वर्गात त्यांचा पुन्हा झुछेख केला आहे. झुदाहरणार्थ, रथोद्धता १ रणपिङ्गलांत प्राचीन वर्गपद्धति आहे; पण ओका वर्गातील वृत्तांचा अनुक्रम ठरवितांना त्रिकगणसाम्य हें चरणान्ताकडून चरणारम्भाकडे पहाण्यांत आलें आहे