पान:छन्दोरचना.djvu/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ८७ यमक, यति, अक्षर अाणि गण ५ गणविचार गण म्हणजे चरणाचा स्वाभाविकपणें पडणारा भाग होय. पद्य जर आवर्तनी असेल तर चरणांत ठराविक कालांत झुचारल्या जाणा-या अक्षरांचे जे गट पडतात ते स्वाभाविक गण होत. हे सदैव ओकाच अक्षरसङ्ख्येचे आणि लगक्रमाचे कसे असतील ? *अच्युतं केशवं रामनारायणमू” या चरणांत (-७ - ) असे त्र्यक्षरी गण चार पडतात, तर *धुनोतु नेी मनेीमलं कलिन्दनन्दिनी सदा”या चरणांत(७ - ७ -) असे चतुरक्षरी गण चार पडतात. रुक्मवती वृत्तांत (-७ ७ --) असे पद्माक्षरी गण दोन पडतात तर दोधक वृत्तांतील दोन गण (-७ ७ - ७, ७ ) आणि (- ७ ७ --) असे भिन्न भिन्न पडतात. शालिनी वृतांत गण या दृष्टीने पहातां (-- --) आणि (-७ --~ --) असे पडतील. पिङ्गलोक्त त्रिक वृत्ताचें लक्षण म्हणजे चरणांतील अक्षरांची सङ्रव्या आणि लगक्रम हीं साड्गण्याच्या ज्या अनेक शास्त्रोत पद्धती आहेत त्यांपैकीं पिङ्गलाच्या पद्धतींत त्र्यक्षरी गणांची, त्रिकांची येोजना आहे. ही पद्धति अधिक रूढ झाल्यामुळे गण हे त्र्यक्षरीच असले पाहिजेत हा समज रूढ झाला आहे. या गणांतहि काही शुभ आणि काही अशुभ मानण्यांत येथून त्यांच्या देवता आणि त्यांचीं फलें हीं कल्पिण्यांत आलीं आहेत! पण या देवखुळेपणाच्या प्रपञ्श्वाला पिङ्ग या त्र्यक्षरी गणांच्या नावांच्या साहाय्याने कोणत्याहि वृत्ताचें लक्षण थोडक्यांत आणि अचूक माण्डून ठेवितां येतें ही गोष्ट खरी; आणि म्हणूनच विष्णूने जसे त्रैलोक्य व्यापिलें तसें य, म, त, र, ज, भ, न, स, ल आणि गा या दहा अक्षरांनी, समस्त वाङ्मय व्यापून टाकिलें आहे असें केदारभट्ट' म्हणतो. १ “ मयरसतजभनलगर्समित भ्रमति वाङ्मयं जगति यस्य स जयति पिङ्गलनागः शिवप्रसादाद्विशुद्धमतिः” (हलायुध) ** मयरस्तजभ्नगैलन्तैरेमिर्दशभिरक्षरैः समस्तं वाङ्मयं व्याप्तं त्रैलोक्यमिव विष्णुना ” ( के १॥६)