पान:छन्दोरचना.djvu/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 6o ऋकाराला स्वर न समजतां र+अ असें अक्षर समजून त्या धोरणानें निरपवाद रचना करण्याचा जो झुपक्रम मी चालू केला आहे तो कुणेट यांनी दाखविलेल्या दिशेनेच आहे. परंतु या ओवढ्याशा सुधारणेलाच अज्ञान आग्रहाने किती विरोध होत आहे! मग कुण्टे यांची सम्भावना ६५ वर्षांमागे कशी झाली असेल याची कल्पनाच करावी. शिष्टसम्मत आणि सर्वत्रप्रचलित असा स्पष्टोचार हवा. जा स्पष्टोचार शिष्टसम्मत आणि सर्वत्र प्रचलित आहे त्याप्रमाणे जें लेखन तें शुद्ध होय आणि त्याप्रमाणेच पद्यांतहि रचना असावी. वैयक्तिक झुचारवैचित्र्याला मात्र अगदी महत्व देअं नये. w

  • दीर्घाक्षरमपि जिह्वा हस्वं चेत्पठाते तदपि भवति लघु

द्वौ वा त्रीनथ वर्णानेक जातीहि शीघ्रपठनाच” (के २२ टीका) हा नियम नागर सुसंस्कृत मराठीचा नव्हे. त्याचप्रमाणे दैनिक बोलींत काही झुचार आपण घाओीघाओीने अस्पष्ट आणि लघु करितीं; त्याप्रमाणे रचना करितां कामा नये. झुदाहरणार्थ ‘महा' या शब्दांतील * हा'चा झुचार घाऔीघाओीने कित्येकदा अस्पष्ट आणि -हस्व केला जातो म्हणून काही

  • पार्थसखा म्हण बोधितसे भगवन्त पहा महाभारतयुद्धीं ” (झुभ) * महाराष्ट्राच्या पुण्याओीच्या फुलल्या फुलवेली ” (कुगी) अशी रचना रसिकमान्य होणार नाही. प्राचीन मराठी कवींच्या काव्यांत शैथिल्य आढळतें म्हणून तशी रचना आता भाषा नागर, सुसंस्कृत, सुसङ्घटित आणि रेखीव झाल्यावराह करणें असमंजसपणाचें होऔील. सोहिरोबा आम्बिये यांच्या
  • सर्वची पाहातां झुदासिन मना काहींचि ना वाटते हे पश्चात्मक सव विश्वरचना सम्भूत हैं आटतें, ना पाचारित अर्डिंग येथुनि बहू वैराग्य हें दाटतें, सोहीरा म्हणे भ्रान्तिर्चे वसन की निभ्रान्त हें फाटतें” (सोआप १७१)

या शार्दूलविक्रीडितांतील श्लोकासारखी रचना आता असह्यच झाली पाहिजे.