पान:छन्दोरचना.djvu/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०५ पीडीएफ सुरेशभट इनच्या सौजन्याने वृत्तविचार नावें झुचारसुलभ असावीत. कुसुमितलता-वेलिता, भुजङ्गविजूम्भित अित्यादि नावें फार दीर्घ आहेत. सुदैवाने अशी नावें फार नाहीत. वंश-पत्र पतित हें नाव प्राचीन कालापासून रूढ असलें तरी बोजड आहे म्हणून त्याच्या ठिकाणीं स्वयम्भूचे वंशदल हें आखूड आणि सुटसुटीत नाव निश्चित केलें वृत्तविस्तार देण्यापूर्वी अॅका सुपरिचित परन्तु वृत्तजातिच्छन्दांपैकी कोणत्याच वगत बसूं न शकणा-या अशा ओका पद्यप्रकाराचा विचार केला पाहिजे. तो पद्यप्रकार म्हटला म्हणजे श्लोक वा अनुष्टुभू होय. याला छन्द म्हणतात; पण यांत लगत्वभेद आहे. याला वृत्त म्हणावें तर लगक्रम निश्चित् नाही; आणि जाति म्हणावें तर काही भाग वृत्ताप्रमाणे अचल आहे, आणि झुर्वरित भाग निश्चित नाही; नि मात्रांची सङ्ख्याहेि नियमित नाही. वराहमिहिर श्लोकलक्षण पुढीलप्रमाणे साङ्गतो * पञ्चमं लघु सर्वेषु सप्तमं द्विचतुर्थयोः यद्वच्छलोकाक्षरं तद्व लधुतां याति दुःस्थितैः” (वबृ १०३॥५७) श्रुतबोधकार लक्षण साङ्गतांना सहावें अक्षर गुरु पाहिजे ही गोष्ट अधिक

  • श्लोके प्रष्टुं गुरु ज्ञेयं

सर्वत्र लघु पञ्चमम् द्विचतुष्पादयोर्हस्वं सप्तमं दीर्घमन्ययोः” (श्रुबो १०) चरणान्तीं यति असल्यामुळे आठवें अक्षर लघु असलें तरी तें म्हणतांना गुरुच होतें म्हणून आठवें अक्षर गुरु पाहिजे ही अट साङ्गितलेली नाही परन्तु या दोन श्लोकांचा अर्थ ओवढाच होतो की विषमचरणान्तीं [० ---] हा अक्षरक्रम असावा आणि समचरणान्तीं [ ० – ७ –] हा अक्षरक्रम असावा .