पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिसत नाही आणि आपल्या बहिणींचे अश्रू पुसण्याची तिळमात्र इच्छाही दिसत नाही.
 बेजिंग परिषद हे जागतिक महिला चळवळीवर कोसळलेले एक मोठे अरिष्ट आहे. चळवळ पुन्हा योग्य मार्गावर आणायची असेल तर आजपर्यंत मूक राहिलेल्या कष्टकरी, स्वयंरोजगारी आणि उद्योजक महिलांनी बेजिंगविरुद्ध निषेधाचा आपला आवाज उठवला पाहिजे आणि सर्व जगाला स्पष्ट बजावले पाहिजे की, 'स्त्रिया माणसे आहेत आणि म्हणून त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे.'

(शेतकरी संघटक, २१ फेब्रुवारी १९९६)

■ ■

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १३६