पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
गीतारहस्यांतील संक्षिप्त चिन्हांचा खुलासा
व संक्षिप्त चिन्हांनीं दाखविलेल्या
ग्रंथांबद्दल माहिती.
अथर्व. अथर्वदेव.साचा:अथर्ववेद? कांड, सूक्त आणि ऋचा यापुढले आंकडे आहेत.
अष्टा. अष्टावक्रगीता. अध्याय व श्लोक. अष्टेकर आणि मंडळीची गीतासंग्रहाची प्रत.
ईश. ईशावास्योपनिषत्. आनंदाश्रम प्रत.
ऋ. ऋग्वेद. मंडल, सूक्त व ऋचा
ऐ. किंवा ऐ.उ. ऐतरेयोपनिषत्. अध्याय, खंड व श्लोक. आनं. प्रत.
ऐ.ब्रा. ऐतरेय ब्राह्मण. पंचिका व खंड. डा. हौडा यांची प्रत.
क. किंवा कठ. कठोपनिषत्. वल्ली व मंत्र. आनं. प्रत.
केन. केनोपनिषत् (=तलवकरोपनिषत्). खंड व मंत्र. आनं. प्रत.
कै. कैवल्योपनिषत्. खंड व मंत्र. २८ उपनिषदें, निर्णयसागर प्रत.
कौषी. कौषीतक्युपनिषत् किंवा कौषीतकिब्राह्मणोपनिषत्. अध्याय व खंड. क्वचित्[टंकनभेद] या उपनिषदाच्या पहिल्या अध्यायासच ब्राह्मणानुक्रमानें तृतीयाध्याय असें म्हणतात. आनं. प्रत.
गा. गाथा तुकारामाची. दामोदर सांवळाराम प्रत. सन. १९००.
गी. भगवद्गीता[टंकनभेद]. अध्याय व श्लोक[टंकनभेद]. गी.शांभा. गीता शांकरभाष्य. गीता राभा. गीता रामानुजभाष्य. गीता आणि शांकरभाष्य यांच्या आनंदाश्रमप्रतीच्या अखेर शब्दांची सूचि असून तिचा आम्हांस पुष्कळ उपयोग झाला असल्यामुळें तिच्या कर्त्याचे आम्ही आभारी आहों. रामानुजभाष्य वेंकटेश्वर[टंकनभेद] समाचार छापखान्यांत छापिलेलें; माध्वभाष्य कुंभकोणाचे कृष्णाचार्य यांनी छापिलेले; आनंदगिरीची टीका आणि परमार्थप्रपा जगद्धितेच्छु छापखान्यात छापिलेली; मधुसुदनी टीका नेटिव्ह ओपिनियन छापखान्यात छापिलेली; श्रीधरी व वामनी (मराठी) निर्णयसागरांत छापिलेली; पैशाचभाष्य आनंदाश्रमांत छापिलेलें; वल्लभसंप्रदायी तत्त्वदीपिका गुजराती प्रिंटिंग प्रेस मधली; नीलकंठी मुंबईच्या महाभारतांतली; आणि ब्रह्मानंदी मद्रासेस छापिलेली; या टीकांचा आम्हीं उपयोग केला आहे. पण यापैकीं पैशाचभाष्य व ब्रह्मानंदी खेरीजकरून बाकीच्या आणि निंबार्क संप्रदायाची व दुसऱ्या कांही टीका मिळून एकंदर पंधरा संस्कृत टीका गुजराती प्रिंटिंग प्रेसनें