पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

尊 ভাৱস্থাৰ 等邨\$ नाहीं असें दाखवून वासनाक्षय झाला तरी देखील ज्ञानी पुरुषानें परमेश्वरार्पणपूर्वक बुद्धीनें लोकसंग्रहार्थ केवळ कर्तव्य म्हणून सर्व कर्मे केला पाहिजेत, हा कर्मयोगाचा सिद्धान्त गीतेंत विस्तारंकरून वर्णिला आह. परमेश्वरास सर्व कर्मे समर्पण करून युद्धकर असा अर्जुनास युद्ध करण्याचा विशेष उपदेश आहे खरा; पण तो तत्कालीन प्रसंगाला अनुसरून आहे (गी. ८.७). अर्जुनाप्रमाणेच शेतकरी, सोनार, सुतार, लोहार, वाणी, उदमी, व्यापारी, ब्राह्मण, कारकून वगैरे च आपआपल्या अधिकारानुरूप आपले व्यवहार परमेश्वरार्पणबुद्धीनें चालू ठेवून जगाचे धारणपोषण केले पाहिजे; ज्याला जेो धंदा निसर्गतः प्राप्त झाला आह तो त्यानें अशा प्रकारें निष्काम बुद्धीनें चालू ठेविला म्हणजे कत्र्याला त्याचे कांहुँीं पाप लागत नाही; कमें तेथून सर्व सारखींच; दोष कत्यांच्या बुद्धांत आहे, कर्मात नाहीं; म्हणून बुद्धि सम करून सूर्व कर्म केल्यानें पूरमेश्वराची उपासना घडून पाप न लागतां अखेरीस सिद्धि मिळत्ये;-असा या सर्व उपदेशाचा इत्यर्थ आहे. पण कांहीं झाले तरी नाशवंत दृश्य सृष्टापलीकडे जाऊन आत्मानात्मविचाराच्या खोल पाण्यांत शिरणे योग्य नव्ह, असा (विशेषतः अर्वाचीन काली) ज्यांचा कृतसंकल्प आहते ब्रह्मात्मैक्यरूप परम साध्याची उच्च पायरी सोडून देऊन मानव जातीचे कल्याण किवा सर्वभूतहित इत्यादि खालच्या पायरीच्या आधिभौतिक दृश्य पण अनित्य तत्त्वापासूनच आपल्या नीतिशास्राच्या विवेचनास सुरुवात करीत असतात. परंतु एखाद्या झाडाचा शेंडा तोडिला म्हणून तें झाड ज्याप्रमाणें नवें म्हणतां येत नाहीं, तद्वत् आधिभौतिक पंडितांनीं निर्माण केलेलं नीतिशास्र मुंडे म्हणजे अपुरें असले तरी नवें होत नाहीं. आमच्याकडे ब्रह्मात्मैक्य कबूल न करितां प्रत्येक पुरुष स्वतंत्र मानणाच्या सांख्यशास्रज्ञ पंडितांनीं देखील जगाचे धारणपोषण कोणत्या गुणांनी होतें व विनाश कोणत्या गुणांनीं होतो हें पाहून सत्त्व, रज व तम या तीन गुणांचीं लक्षणे ठरविलीं आहत; व त्यांपैकीं सात्त्विक सद्गणांचा परम उत्कर्ष करणें हेंच मनुष्याचे कतव्य असून त्यानंच अखेर त्रिगुणातीत अँवस्था प्राप्त होऊन मोक्ष मिळतो असें प्रतिपादन केले आह; आणि भगवद्गीतेच्या सतराव्या व अठराव्या अध्यायांत थोड्या फरकानें हाच अर्थ वर्णिला आहे.* सात्त्विक सदुणांचा परम उत्कर्ष म्हटले काय, किंवा आधिभौतिक वादाप्रमाणें परोपकारबुद्धीची किंवा माणुसकीची वाढ म्हटलें काय, अथै एकच. महाभारतांत किंवा गीतेंत या सर्व आधिभौतिक तत्त्वांचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे इतकेंच नव्हे, तर धमी.

  • बाबू किशोरीलाल सरकार एम्.ए., बी. एल. यांनीं 7Ag f/tada System g/ Moral SciencezĮrafąf#š gā န္တြင္ဆိုႏိုင္တြ लिहिले आहे तें याच प्रकारचेम्हणजे सत्व, रज व तम या तीन गुणांच्या पायावर आहे. ;