Jump to content

पान:गंगाजल (Gangajal).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गंगाजल | ७३ 'तुझ्या जिवंत राहण्यामुळे होणाऱ्या कल्याण-परंपरेचे जतन कर व इन्द्रपदाहून काकणभरही वैभवाने कमी नसलेल्या राज्याचा उपभोग घे? हा व्यवहारिक उपदेश राजाने मानिला नाही. त्याने सिंहाला उत्तर दिले; सिंहाचा अनुनय केला. क्षतापासून रक्षण करतो तो 'क्षत्रिय' समजतात. मी जर ते केले नाही, व कोणाचा तळतळाट घेऊन आपला जीव वाचविला, तर ते योग्य होईल का? . ही अशी-तशी साधी गाय नाही. प्रत्यक्ष कामधेनूची ती मुलगी आहे. व्हा मला खा, आणि हिला सोड. तुझा उपवास फिटेल. गुरूंचेही हित साधेल. तूही चाकर आहेस. तुझ्यावर नेमलेले काम तू महायत्नाने करितो माहस. मग माझ्यावर सोपविलेले काम न करिता मी आपल्या नियोजकापुढे कसा उभा राहू? क्षणभगुर नाशवंत शरीराविषयी मला आस्था वाटत नाही. मला काळजा आहे ती माझ्या यशाबद्दल. ते यशोरूपी शरीर राखण्यासाठी त मला मदत कर. ह्या इथे रानात आपण भेटलो, एकमेकांशी बोललो, त्यामुळे आपला सबध जडला आहे. आता. हे भतनाथानचरा. माझी एवढी प्रेमाची विनंती ऐक, गायीला सोड व मला खा. आपण जीव तोडून सांगितले, तरी राजा 'मरून कीर्तिरूपे उरण्या'च्याच गोष्टी बोलतो आहे. हे ऐकन सिंहाला नवलच वाटले. 'जिवत ( कल्याणपरंपरा जतन करण्याऐवजी कीर्तीच्या हावेने केवढी अनर्थ रा हा राजा ओढवून घेणार आहे, हे त्याला कसे कळत नाही? राजा वक मला, तर केवढे अराजक माजेल, हे त्याला कळत नाही का?' वगैरे र सिहाच्या मनात आले असणार. 'पण जाऊ दे, आपल्याला काय ! हा स्वप्नाळू माणूस म्हणतो आहे तसे करावे,' असा सिंहाने निपुत्रिक मेला, तर कव विचार सिंहाच्या मना करावयाचे? हा स्वप्नाळू , विचार केला. तोही सुटला. प्रसादाने त्याला मु सांगितला आहे. भोळ्या सिंहाने गायीला सोडले. राजावर देवांनी पुष्पवृष्टी केली व सुटला. राजावर ऋषी प्रसन्न झाले. गाय प्रसन्न झाली व त्याच्या न त्याला मुलगा झाला, वगैरे पुढचा कथाभाग कालिदासाने तिला आहे. पण त्या बिचाऱ्या सिंहाबद्दल एक शब्दही नाही. ही सर्व