Jump to content

पान:गंगाजल (Gangajal).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ | गंगाजल आजच कां बरं ही सर्वजणं आठवली? माझ्या हाकेला ओ देऊन आलींदेखील? पण निघून गेली, बोलली नाहीत. तोंड लपवून, टोपी घालून मी मलाच कां दडवीत होतें? माझ्या दु:खाने शेवटी मला दुखावलेंच सर्व नाटक सर्व स्वप्नांतला खेळ पण नीटसा साधला नाहीच. अरे, वाढलंस का? उशीर होतो आहे, कामाचा ढीग पडला आहे. आलें एकदाची वेळेवर आहांत का सगळे? दोघेदोघेजण या, काम समजावून सांगते आज जायच्या आधी अर्धं झालं पाहिजे. एक समाधानाचा सुस्कारा एक अभिमानाचं हसू