पान:कबुतरखाना.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आत खोल

नितळ गहिऱ्या पाण्यावर
कधी एखादी मासोळी
उसळून येते
चमकून जाते
पुन्हा सारा डीह शांत
  ... मासोळी मात्र
  आत खोल कुठंतरी
  सारा डोह घुसळत असते
  नकळत अविरत

  

८८ / कबुतरखाना