पान:कबुतरखाना.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कविता


रणरणत्या उन्हात
पावसाची सर कोसळून जावी
आणि पुन्हा पसरावं
आरसपानी सोनं इथं तिथं

साठलेल्या जिवंत पाण्यात
आनंदानं पिसं फुलवून
चिमण्यांनी हुंदडावं... डुंबावं...
तसा प्रत्येक शब्द माझ्या
भिजल्या डोळ्यांत बागडून
जाऊन बसला आहे
तारेवरच्या सोनउन्हात
...कदाचित तारेवर अंग फुलवून
बसलेल्या शब्दांनाच
कविता म्हणत असतील...


तुला काय वाटतं?

कबुतरखाना/१