पान:कबुतरखाना.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चांदणं

चांदणं लाही लाही
देहाकाठी मदनवारा
भिर्भिर आत्मा अपरात्रीला
जसा नभातून अनाम तारा

चांदण्यात विझे धुकं
चित्कारे पाखरू मुकं
एका स्मृतीपाशी उभी
तिच्या सावलीची चूक

तळ्यातल्या चांदण्यात
सळसळते झाड जुने
तिच्या वाटेवरी साधू
पानोपानी त्याचे गुन्हे

आत्मा हो तल्लीन
चांदण्यात भिजे म्लान
त्याच्या रूध्द कंठातून
उमटले दिव्य गान

गाण्याच्या स्वरांतून
चांदण्याचा दहीकाला
सुराभोवती पहारा
प्रहर अवघा ताल झाला

७८ / कबुतरखाना