Jump to content

पान:कबुतरखाना.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बुजगावणं

बुजगावण्याला अचानक येते जाग
भिरभिरते गोफण
आदळतात पोपटी पिकांवर
हाकाऱ्यांचे आवर्त
आणि अवघं पोपटी रानच
आभाळात झेपावतं कलकलत
क्षितिजापार निषेध नोंदवत

उठलेलं रान असंच कधीतरी
बेमालूमपणे
उभ्या पिकांत मिसळून जातं पुन्हा
तेव्हा तिथली पिकं अधिक पोपटी
अधिक तजेलदार होतात...
...तिथलं बुजगावणं मात्र
गाफील असावं लागतं
मग तुम्हाला पिकांचा
कुजबुजाटही ऐकू येईल.

५० / कबुतरखाना