Jump to content

पान:कबुतरखाना.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कंत्राटदारांच्या पोरांनी डान्सबारमध्ये नोटा उडवण्यासाठी
रेव्ह पाय करणाऱ्या सायबांच्या
पुढच्या पिढ्यांच्या राज्याभिषेकासाठी
भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बायकांची
सोन्यारूप्याची मिजास भागवण्यासाठी

चेहरा हरवलेल्या गावांचा
गर्दहिरवा इतिहास
पुसून जाताना
आणखी गरीब होणाऱ्या दारिद्र्यावर
घासलेटचा एखादा दिवा
कुणी तरी पेटवा रे!

३६ / कबुतरखाना