पान:कबुतरखाना.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तू कधी उगवणार ?

तू उगवणार म्हणून
आमच्या झुंजीच्या कोंबड्यांनी
बेंबीच्या देठापासनं बांग दिली
त्यांची पुण्याई मोठी म्हणून
उगवतीला तांबडं फुटलं...

तांबडं फुटलं पण...
तू काही उगवलाच नाहीस.
इथं मात्र एक से एक
तोतये कोंबडे आता पेव फुटल्यासारखे बांगारतात

आता तर त्यांनी
दर पाच वर्षांनीच
तू उगवणार म्हणून
बांग द्यायला सुरुवात केलीय

... तू कधी उगवणार ?

२६ / कबुतरखाना