Jump to content

पान:कबुतरखाना.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कसलं वादळ उठतंय... काय होतंय....
कॅनव्हास फाटला तर ?
"कसं काय बरं आहे ना?" असं विचारणारा
अचंबा करत समोरून कधीचाच गर्दीत गायब...
जाऊ दे झालं... ओठ कोपऱ्यात हळूच गोळा होतात.

ट्रैफिक जाम ...
हॉर्न आणि पुसट शिव्या ऐकत
बाजूला होताना
आतून एक जोरदार उबळ येते
कोकलणाऱ्या सगळ्या ट्रॅफिकलाच
बेंबीच्या देठापासून विचारावं,
"काय, कसं काय बरं आहे ना ?"
आणि पहावं त्यांचे ओठही
कोपऱ्यात गोळा होतात का ते ...

२० / कबुतरखाना